Homeताज्या बातम्या

लोकनेते विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त शिवसंग्रामकडून निराधारांना भोजन व जीवनावश्यक साहित्याचे वाटप

बीड : लोकनेते विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त शिवसंग्रामच्या वतीने बीड येथील जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्रात निराधार व गरजू बांधवांसाठी भो

शेतकर्‍यांनी खरीप पेरणीपूर्वी बियाण्यांवर बीजप्रक्रिया करावी-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे
गाईला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या; निरुपयोगी जनावरांबाबत स्पष्ट भूमिका घ्यासर्व धर्मीय नागरिक एकवटले; जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर
गेवराईतील वाळू घोटाळा; तहसीलदारांसह प्रमुख सूत्रधारांवर गुन्हे दाखल कराएसआयटी चौकशीचीही मागणी; गेवराईतील सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी


बीड : लोकनेते विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त शिवसंग्रामच्या वतीने बीड येथील जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्रात निराधार व गरजू बांधवांसाठी भोजन तसेच जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. समाजसेवेच्या माध्यमातून लोकनेते विनायकराव मेटे यांना अभिवादन करत सेवाभावी उपक्रम उत्साहात पार पडला.
शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला मराठवाडा अध्यक्ष अनिल घुमरे पाटील, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कोकाटे, शहराध्यक्ष सुहास पाटील, तालुकाध्यक्ष पंडितराव माने, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. मनीषा कूपकर, मनोज जाधव, गणेश साबळे, हरिश्चंद्र ठोसर, शैलेश सुरवसे, संगीता ठोसर यांच्यासह शिवसंग्रामचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकनेते विनायकराव मेटे यांच्या समाजहिताच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सेवाभावी विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. गरजू, निराधार आणि वंचित घटकांच्या सेवेतूनच त्यांच्या कार्याला खरी आदरांजली वाहता येईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या सेवाभावी उपक्रमाचे आयोजन शिवसंग्रामचे मराठवाडा अध्यक्ष अनिल घुमरे पाटील यांनी केले. उपक्रमामुळे गरजू बांधवांना मदतीचा हात मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

COMMENTS