Homeताज्या बातम्या

तिगावच्या सरपंच सौ. अर्चना राज पाटील यांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड २०२६’

सौर ऊर्जा, जलसंधारण आणि विकासकामांची दखल वडवणी : वडवणी तालुक्यातील तिगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अर्चना राज पाटील यांना 'लोकमत सरपंच अवॉर्ड

शिरपुरात पोटच्या मुलानेच केला जन्मदात्या आई-वडिलांचा खून; खलबत्ता-मुसळाने केले प्रहार
सोलार कंपनीकडून लाखोंची फसवणूक; नांदेडच्या भाग्यनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी
जनगणना मोहिमेत सिंधुदुर्गची राज्यात आघाडी; घरगणना शंभर टक्के पूर्ण करणारा पहिला जिल्हा
सरपंच अवार्ड 2026 पुरस्काराने सरपंच अर्चना राज पाटील सन्मानित!* - YouTube

सौर ऊर्जा, जलसंधारण आणि विकासकामांची दखल

वडवणी : वडवणी तालुक्यातील तिगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अर्चना राज पाटील यांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड २०२६’ या अत्यंत प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, दैनिक लोकमतचे संपादक नंदकिशोर पाटील व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते शनिवारी (दि. १३ जून २०२६) त्यांना ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सन्मानामुळे तिगावच्या सर्वांगीण विकासकामांवर राज्यस्तरीय मोहोर उमटली असून सरपंच सौ. अर्चना पाटील यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दैनिक लोकमतच्या वतीने आयोजित या पुरस्कार सोहळ्यात तिगाव ग्रामपंचायतीने सौर ऊर्जेच्या क्षेत्रात आणि जलसंधारणात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची निवड करण्यात आली. तिगाव ग्रामपंचायतीने सार्वजनिक विहिरींवर सोलार विद्युत पंप, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी तसेच सार्वजनिक ठिकाणी सौर पथदिवे बसवून वीज बचतीचा आणि पर्यावरणपूरक ग्रामविकासाचा आदर्श पॅटर्न निर्माण केला आहे. तसेच पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करून तिगाव पूर्णपणे टँकरमुक्त केले आहे.

पाच तांडे आणि आठ वस्त्यांमध्ये विखुरलेल्या या गावामध्ये रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधा सक्षमपणे पोहोचवण्याचे काम उच्चशिक्षित सरपंच सौ. अर्चना राज पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या करण्यात आले आहे. या सोहळ्याला ड. राज पाटील (संस्थापक अध्यक्ष, लढा दुष्काळाशी फाउंडेशन), इव्हेंट विभागाचे डेडवाल, अक्षय शाहूजी यांच्यासह विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविस्तार अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS