Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत 24 तासांमध्ये तीन पोलिसांवर हल्ले

मुंबईः पोलिसांना मारहाण झाल्याचा तीन घटना गुरूवारी शहरात घडल्या. याप्रकरणी देवनार, कुरार व साकिनाका पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आ

‘निवडणूक संकल्प’; मध्यमवर्गीयांची निराशा
नागपूर-शिर्डी पहिल्या बसचे श्री साई संस्थानने केले स्वागत
आ. तनपुरे यांच्या प्रयत्नातून 21 नवीन रोहित्रे बसविणार

मुंबईः पोलिसांना मारहाण झाल्याचा तीन घटना गुरूवारी शहरात घडल्या. याप्रकरणी देवनार, कुरार व साकिनाका पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीन गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, देवनार येथील घटनेत महिला पोलिसाला मारहाण करण्यात आली आहे.
देवनार पोलिसांच्या हद्दीत घडलेल्या हल्ल्याच्या घटनेत महिला पोलीस शिपाई मनिषा देशमुख यांच्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे, धमकावणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गोवंडी येथील मानखुर्द – घाटकोपर जोडरस्ता येथील ‘लजीत’ हॉटेलजवळ एक दाम्पत्य रस्त्यावर भांडण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तक्रारदार महिला पोलीस इतर पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाल्या. त्यावेळी महिला आरोपी साफिया खान (28) हिने महिला पोलिसाचे केस धरून तिला मागे खेचले व दुचाकीवर ढकलले. तसेच आरोपी महिलेच्या पतीने पोलीस शिपाई गोरे यांच्या कानाखाली मारली व त्यात त्यांच्या उजव्या डोळ्याखाली इजा झाली. या प्रकरानंतर साफिया खानला अटक करण्यात आली. सीआरपीसी कलम 41 (अ) (1) अंतर्गत नोटीस देऊन तिला सोडण्यात आले. याप्रकरणी तिचा पती फिरोज खान (45) याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. साकिनाका येथे घडलेल्या दुसर्‍या घटनेत रॉबीन यल्लपा ऊर्फ सलीम येला याला पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात यापूर्वी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. आरोपी साकीनाका परिसरातील संघर्ष नगर येथील एका इमारतीच्या मागे संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला चौकशीसाठी ताब्यात गेले असता त्याने पोलिसावर हल्ला केला. पोलिसांना मारहाण करणार्‍या रॉबीनला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरार येथे पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी अनिल हिवाळे (35) व शेखर बनसोडे (34) या दोघांना अटक करण्यात आली. दोघेही वाहनचालक आहेत. दोन्ही आरोपी कुरार गाव येथे दारू पिऊन रस्त्यावर आरडाओरडा करीत होते. तेथे गेलेले पोलीस शिपाई संतोष सुरनर यांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हिवाळेने सुरनर यांचा गणवेश फाडला, तर बनसोडेने सुरनर यांना मारहाण केली. या दोघांनाही घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. बनसोडेविरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. त्यात विनयभंग व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन गुन्ह्यांचा समावेश आहे. दोन्ही आरोपींविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

COMMENTS