Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अ‍ॅपद्वारे अमली पदार्थाची विक्री करणारा अटकेत

पुणे : अंमली पदार्थाची तस्करी करणार्‍यांनी आता ऑनलाइन विक्री सुरू केली असून अमली पदार्थाची घरपोहोच ऑनलाइन डिलिव्हरी केली जात आहे. पुणे पोलिसांनी

धक्कादायक ! आईने मुकबधीर मुलीला चौथ्या मजल्यावरून फेकले.
सुवर्णनगरीत ईडीकडून छापेमारी
दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्राला सात राष्ट्रीय पुरस्कार

पुणे : अंमली पदार्थाची तस्करी करणार्‍यांनी आता ऑनलाइन विक्री सुरू केली असून अमली पदार्थाची घरपोहोच ऑनलाइन डिलिव्हरी केली जात आहे. पुणे पोलिसांनी ऑनलाइन अमली पदार्थांची विक्री उघडकीस आणली आहे. ऑनलाइन डिलिव्हरी अ‍ॅपद्वारे अमली पदार्थांची खरेदी विक्री करणार्‍यांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईत तब्बल 51 लाख रुपयांचा एलएसडी या अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. रोहन दीपक गवई (वय 24), सुशांत काशिनाथ गायकवाड (वय 26), धीरज दीपक ललवाणी (वय 24), दीपक लक्ष्मण गेहलोत (वय 25) आणि ओमकार रमेश पाटील (वय 25) यांना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस कर्मचारी विशाल शिंदे यांना पुणे शहरात ऑनलाइन डिलिव्हरी अँपद्वारे एलएसडी या अमली पदार्थाची खरेदी विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सखोल चौकशी करून सुरुवातीला रोहन गवळी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल 90 हजार रुपये किमतीचे 30 मिलिग्रॅम एलएसडी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्यानंतर त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत इतर आरोपींची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले. एकूण पाच आरोपीकडून पोलिसांनी 51 लाख रुपये किमतीचे एलएसडी या अमली पदार्थाचे 17 ग्रॅम वजनाचे 1032 तुकडे जप्त केले.

COMMENTS