राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय बीड व प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालय बीड येथे हरितक्रांतीचे जनक तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची

राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय बीड व प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालय बीड येथे हरितक्रांतीचे जनक तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक पी. एन. पाटील हे होते, तर प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. आय. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यानंतर ए. एन. पवार यांनी अध्यक्ष पी. एन. पाटील यांचे, तर व्ही. आर. घोडके यांनी प्रमुख पाहुणे ए. आय. पाटील यांचे स्वागत केले. यावेळी ए. एन. पवार यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्याचा व हरितक्रांतीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा आढावा विद्यार्थ्यांसमोर मांडला. अध्यक्षीय समारोपात पी. एन. पाटील यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याचा तसेच महाराष्ट्रातील कृषी विकास आणि हरितक्रांतीतील त्यांच्या योगदानाचा सविस्तर ऊहापोह करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. पी. जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती ए. के. वाघमारे यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS