Homeताज्या बातम्याशहरं

वारंवार भीक मागून त्या हॉटेल मालकाचे बिल भागवणार : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची घोषणा

इस्लामपूर / प्रतिनिधी : सांगली-माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगोला तालुक्यातील मामा भाचे हॉटेल मालक अशोक शिणगारे यांची उधारी बुडवली. त्यामुळे त्याने

विमानांच्या आवाजाने बंकरमध्ये जीव मुठीत : सौरभ जाधव याचा थरारक अनुभव
पोलिसांना मिळणार 12 ऐवजी 20 दिवसाच्या किरकोळ रजा : ना. शंभूराज देसाई
विषमुक्त शेतीसह विषमुक्त कृषी उत्पादने काळाची गरज : ना. देवेंद्र फडणवीस

इस्लामपूर / प्रतिनिधी : सांगली-माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगोला तालुक्यातील मामा भाचे हॉटेल मालक अशोक शिणगारे यांची उधारी बुडवली. त्यामुळे त्याने सदाभाऊ ना रस्त्यावर अडवले. सदाभाऊ हे आमच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आहेत. त्यांना अडवलं हा आमच्या वाळवा तालुक्याचा अपमान महाराष्ट्रात भर होत आहे. आम्ही भीक मागून पैसे गोळा करून त्या हॉटेलचे मालक अशोक शिणगारे यांचे देणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व भागवत जाधव यांनी दिली आहे.
खराडे जाधव म्हणाले, सदाभाऊ यांना उधारीसाठी इथूनपुढे कोणीही अडवून आमच्या वाळवा तालुक्याचा अपमान करू नये. आमच्याशी संपर्क साधावा आम्ही ती उधारी वारंवार भीक मागून भरू, असेही जाधव म्हणाले.
दोन दिवसांपूर्वी सांगोला तालुक्यातील एका हॉटेल व्यावसायिकाने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना रस्त्यावर अडवून उधारी मागितली. त्यावर महाराष्ट्रात खूप चर्चा सुरू आहे. सदाभाऊ खोत हे वाळवा तालुक्यातील आहेत. त्यांच्या तालुक्यातील भागवत जाधव यांनी मात्र ’आमच्या वाळवा तालुक्याची बदनामी करू नका. त्याचे 66450 रुपये आम्ही भीक मागून उधारी भरणार आहोत. सदाभाऊ पुर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे होते. ज्यांच्याकडे सदाभाऊची उधारी असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा, असे त्यांनी म्हटले आहे.

COMMENTS