सीसीटीव्ही मशीनसह लाखोंची चोरी…पुरावाच केला गायब

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीसीटीव्ही मशीनसह लाखोंची चोरी…पुरावाच केला गायब

अहमदनगर/प्रतिनिधी : आपण करीत असलेली चोरी कॅमेर्‍यात कैद होईल म्हणून चोरटयांनी सुमारे अडीच लाखाच्या ऐवजाची चोरी केल्यानंतर सीसीटीव्ही मशीनचीही चोरी के

देवळाली प्रवरात साई भक्तां कडुन धिरेंद्र शास्ञीच्या तैलचिञाची होळी  
कोपरगाव नगरपरिषदेला ५ कोटी निधी द्या आ. आशुतोष काळेंची पालकमंत्र्यांकडे मागणी
संगमनेरात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

अहमदनगर/प्रतिनिधी : आपण करीत असलेली चोरी कॅमेर्‍यात कैद होईल म्हणून चोरटयांनी सुमारे अडीच लाखाच्या ऐवजाची चोरी केल्यानंतर सीसीटीव्ही मशीनचीही चोरी केली. ही घटना राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे घडली. एका इलेक्ट्रिकल्स दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दुकानातील वायर बंडल आणि इतर सुमारे अडीच लाख किमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. विशेष म्हणजे यावेळी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याने चोरट्यांनी सीसीटीव्ही मशीन देखील चोरून नेले आहे. याबाबत सचिन इलेक्ट्रिकल्सचे मालक महेंद्र अशोक खेडके यांनी लोणी पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी बुद्रुक येथील संगमनेर रस्त्यावरील सचिन इलेकट्रीकल्स या दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील 98 वायर बंडल,तांब्याच्या अर्थींग प्लेट व इतर वस्तू असा सुमारे अडीच लाखांचा माल चोरून नेला. दरम्यान, सचिन इलेक्ट्रिकल्सचे सीसीटीव्ही मशीन चोरून नेण्यात आले असले तरी लोणी ग्रामपंचायत, प्रवरा बँक आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या बँका, दुकाने यांच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात एक संशयित इनोव्हा कार मध्यरात्री आढळून आली आहे. अधिक तपास लोणी पोलिस करीत आहे. चोरी करताना चोरट्यांनी आता पुरावाच मागे राहू नये, यादृष्टीने चालाखी सुरू केल्याचे दिसत आहे. आपण करीत असलेली चोरी सीसीटीव्ही कॅमेर्‍याद्वारे स्पष्ट होणार असल्याने हे कॅमेरे फोडणे तसेच त्याचा डीव्हीआर पळवून नेण्याचे प्रकार होत आहेत. लोणीच्या घटनेतही असेच घडले असल्याने पोलिसांना आता कोणताही पुरावा मागे न ठेवणार्‍या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान आहे.

COMMENTS