2012 पूर्वीची नियुक्ती दाखवून शिक्षक भरतीत करोडोचा घोटाळा : जि.प. सदस्य वाकचौरेंचा दावा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

2012 पूर्वीची नियुक्ती दाखवून शिक्षक भरतीत करोडोचा घोटाळा : जि.प. सदस्य वाकचौरेंचा दावा

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यात सध्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीचर इलिजीबिलीटी टेस्ट-टीईटी) घोटाळा गाजत आहे. पण यापेक्षा भयानक घोटाळा नऊ वर्षांपूर्वी झाल

पो. नि. प्रताप दराडे यांच्या नियुक्तीची राहूरीकरांनी केली मागणी
सुमनबाई वाळुंज यांचे निधन
युवकाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यात सध्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीचर इलिजीबिलीटी टेस्ट-टीईटी) घोटाळा गाजत आहे. पण यापेक्षा भयानक घोटाळा नऊ वर्षांपूर्वी झाल्याचा दावा नगर जिल्हा परिषदेचे सदस्य व भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे. टीईटी परीक्षेतून मुक्तता मिळण्यासाठी 2012 पूर्वीची भरती दाखवून व तसे रेकॉर्ड तयार करून, त्याला मंत्रालयातून मान्यता घेऊन व त्यानंतर शालार्थ आयडीही घेऊन हा घोटाळा झाला असून, यातील प्रत्येक टप्प्यांवर पैशांचे लाखोंचे व्यवहार झाले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असे 500 ते 1000 शिक्षक 2012पूर्वी नियुक्त झाल्याचे दाखवून करोडांचा घोटाळा झाला आहे, असा दावा वाकचौरे यांचा आहे. या शिक्षक भरती घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी व संबंधित अधिकार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
याबाबत वाकचौरे यांनी सांगितले की, टीईटी पेक्षाही मोठा करोडोंची उलाढाल असलेला शिक्षक नियुक्ती घोटाळा राज्यात झाला आहे. यात नगर जिल्ह्यातही शिक्षक भरती घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या टीईटी शिक्षक घोटाळा गाजतो आहे. पण यापेक्षाही एक मोठा शिक्षक भरती घोटाळा महाराष्ट्रात झाला आहे. पण दुर्दैवाने त्याची चर्चा झाली नाही. टीईटी पास नसलेले हजारो शिक्षक सेवेत घेण्यात आले आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

अटीतून सुटका होण्यासाठी…
टीईटीची अट 2013साली लागू झाली व 2013 साली शिक्षकभरती बंद झाली. यातून पळवाट काढत हे शिक्षक 2012 पूर्वी आमच्या शाळेत काम करत होते, असे रेकॉर्ड तयार करून अधिकार्‍यांना पैसे देऊन शिक्षकांना मान्यता मिळवल्या व ते हजारो शिक्षक आज सेवेत रुजू केले आहेत व असे प्रत्येक जिल्ह्यात 500 पेक्षा जास्त शिक्षक आहेत, असे सांगून वाकचौरे म्हणाले की, या घोटाळ्याची पद्धत अशी की शिक्षकांच्या सह्या असलेले हजेरीपुस्तक 2012 पूर्वीपासून दाखवायचे आणि ते शिक्षक 2012पासून नोकरीत होते व त्यामुळे ते शिक्षक भरतीपूर्वी कामाला होते असे रेकॉर्ड तयार करायचे. त्याला शिक्षणाधिकारी यांची मान्यता मिळवली व याला मंत्रालय स्तरावरून मान्यता दिल्या गेल्या व हे शिक्षक 9 वी व 10वीला शिकवत होते असे दाखवून टीईटीतून सूट मिळवून घेतली. (टीईटी 8वीपर्यंत असते). म्हणजे टीईटी पास होण्याचीही किंमत वसूल केली व टीईटी लागू नसण्याचेही पैसे वसूल करण्यात आले. त्यानंतर या शिक्षकांना शालार्थ आय डी देण्यासाठी स्वतंत्र पैसे घेतले गेले आणि पगार सुरू करण्यासाठी पैसे घेतले. त्यानंतर ते 2012 पूर्वीपासून नोकरीत आहे म्हणून त्यांचा लाखो रुपयांचा पगाराचा फरकही काढण्यात आला व त्यातही अधिकार्‍यांनी टक्केवारी घेतली, असा दावा वाकचौरेंनी केला आहे.

ते शिक्षक कर्जबाजारी
गरीब कुटुंबातील अनेक तरुण शिक्षक यात भरडले गेले असून त्यांना हा सगळा खटाटोप करण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी ते मंत्रालय असा किमान 15 लाखापर्यंत खर्च आला आहे. शिक्षण संस्थेने घेतलेले पैसे पुन्हा वेगळेच. जवळपास 20 ते 25 लाख रुपये देऊन या नोकर्‍या मिळाल्या आहेत. यातील अनेक शिक्षकांनी कर्ज काढले आहे. ते कर्जबाजारी झाले आहेत. हा घोटाळा इतका व्यापक आहे की प्रत्येक जिल्ह्यात ही संख्या किमान 500 ते 1000 असावी असा अंदाज आहे. इतके शिक्षक गुणिले किमान 10 लाख धरले तरी या घोटाळ्याचा अंदाज येईल व हा घोटाळा टीईटी घोटाळ्यालाही मागे टाकू शकेल, असा दावा करून वाकचौरे म्हणाले, हा घोटाळा उघड करण्याचा सोपा मार्ग म्हणजे 2012 नंतर शिक्षक भरती बंद असताना 2012 नंतर प्रत्येक जिल्ह्यात नवे शिक्षक किती भरती झाले, त्यात 2012 पूर्वीच्या भरतीची किती प्रकरणे होती, त्यापैकी कितींना मान्यता दिली गेली, ही संख्या घेतली की हा घोटाळा उघड होऊ शकतो. त्याकाळात अतिरिक्त शिक्षक उपलब्ध असताना व शिक्षकभरती बंद असताना ही शिक्षक भरती झाली कशी ? टीईटी पास नसताना हे शिक्षक या व्यवस्थेत कसे आले ? हा प्रश्‍न अधिकार्‍यांना विचारायला हवा, असे स्पष्ट करून ते म्हणाले, महाराष्ट्रातील नवीन शिक्षक भरतीचे हे वास्तव आहे. इतके लाख रुपये देऊन सेवेत आलेले शिक्षक कसे स्वप्नाळू राहतील, असा सवालही त्यांनी केला असून, या 2012पूर्वीच्या भरतीची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.

COMMENTS