Homeताज्या बातम्या

निर्भीड पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते बाळू भंडारे यांचे निधन; किनवटमध्ये शोककळा

किनवट शहरातील ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तथा मुद्रांक विक्रेते अरुण उर्फ बाळू पारप्पा भंडारे (वय 65) यांचे सोमवार (दि. 22 जून) रोजी सकाळ

पंचनाम्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढवा३३ टक्के नुकसानभरपाईच्या अटीचा पुनर्विचार करा ; आ. कोल्हेंनी विधानभवनात वेधले लक्ष  
योगेश फुलशंकर यांचे प्रदीर्घ आजाराने निधनअर्जुन फुलशंकर यांना पुत्रशोक
महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरणजम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये ग्रेनेडचा स्फोट



किनवट शहरातील ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तथा मुद्रांक विक्रेते अरुण उर्फ बाळू पारप्पा भंडारे (वय 65) यांचे सोमवार (दि. 22 जून) रोजी सकाळी 10 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. शिवाजी चौक, किनवट येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने किनवट तालुक्यासह पत्रकारिता, सामाजिक व व्यापारी क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
बाळू भंडारे यांनी आयुष्यभर पत्रकारिता आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडले. अन्याय, भ्रष्टाचार आणि समाजातील विविध समस्यांविरोधात त्यांनी आपल्या लेखणीद्वारे सातत्याने आवाज उठविला. स्पष्टवक्तेपणा, परखड भूमिका आणि निःस्वार्थ सामाजिक बांधिलकी यामुळे त्यांनी तालुक्यात वेगळी ओळख निर्माण केली होती. पत्रकारितेसोबतच मुद्रांक विक्रेते म्हणून त्यांनी प्रामाणिकपणे व्यवसाय सांभाळला. समाजातील सर्व स्तरांतील लोकांशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आणि मदतीस तत्पर असण्यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील एक निर्भीड आवाज, सामाजिक चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ता आणि अनेकांसाठी मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी तसेच मोठा आप्तपरिवार आहे. भंडारे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि शुभचिंतकांमध्ये शोकाचे वातावरण आहे. दिवंगत बाळू भंडारे यांची अंत्ययात्रा मंगळवार, दि. 23 जून रोजी सकाळी 9 वाजता शिवाजी चौक, किनवट येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार असून, घोटी रोडवरील त्यांच्या शेतात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

COMMENTS