मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सोन्याच्या तस्करीविरुद्ध मोठी कारवाई उघडकीस आली आहे. राजस्व गुप्तचर संचालनालय या तपास यं

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सोन्याच्या तस्करीविरुद्ध मोठी कारवाई उघडकीस आली आहे. राजस्व गुप्तचर संचालनालय या तपास यंत्रणेने सुमारे 37 कोटी 74 लाख रुपयांच्या सोन्यासह 24 महिलांना अटक केली आहे. या कारवाईत एकूण 29 किलोहून अधिक सोने जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आफ्रिकेतील केनिया देशातील नैरोबी शहरातून काही महिला मोठ्या प्रमाणात सोने लपवून भारतात आणत असल्याची गुप्त माहिती यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार विमानतळावर विशेष लक्ष ठेवण्यात आले. नैरोबीहून आलेल्या 24 विदेशी महिलांची कसून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान त्यांच्या सामानातून तसेच अंगावरील कपड्यांमध्ये लपवून ठेवलेले 25 किलोहून अधिक सोन्याच्या विटा आणि सुमारे साडेचार किलो सोन्याचे दागिने आढळून आले. जप्त केलेल्या सोन्याची एकूण किंमत अंदाजे 37 कोटी 74 लाख रुपये इतकी असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. ही कारवाई तपास यंत्रणेच्या विशेष मोहिमेअंतर्गत राबवण्यात आली. यंदाच्या वर्षातील विमानतळावरील ही सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात सहभागी महिलांना सोने लपवण्याचे आणि सुरक्षा तपासणीतून सुटण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे.यावरून या संपूर्ण प्रकारामागे आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेले मोठे तस्करी जाळे असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या जाळ्याचे धागेदोरे शोधण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला असून संबंधित व्यक्ती व नेटवर्कचा शोध सुरू आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या सर्व महिलांना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणामुळे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांची सतर्कता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

COMMENTS