सरकारी कामात अडथळा…दोघांना कारावास

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

सरकारी कामात अडथळा…दोघांना कारावास

अहमदनगर/प्रतिनिधी -पोलिसांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल दोघांना दंडासह कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. समन्स वॉरंट बजावण्यासाठी गेल

पारनेर भाजपच्यावतीने सरकार विरोधात चक्काजाम आंदोलन l LokNews24*
जामखेड तालूक्यात पाळला कडकडीत बंद
आ. जगतापांच्या भाजप कार्यालय भेटीवर परिवार नाराज? ; भाजप श्रेष्ठींनी गंभीर दखल घेतल्याची चर्चा

अहमदनगर/प्रतिनिधी -पोलिसांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल दोघांना दंडासह कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. समन्स वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसाला देवराम मारुती गावडे (रा. गावडेवाडी, ढवळपुरी, ता.पारनेर, जि.नगर) याने अडथळा आणल्याप्रकरणी जिल्हा व्यायाधीश यांनी दोन आरोपींना तीन वर्ष सक्त मजुरी व 6 हजार रुपये दंड तसेट दंड न भरल्यास तीन महिने सक्त मजुरी अशी शिक्षा ठोठावली.
याबाबतची माहिती अशी कि, दि.27 नोव्हेंबर 2016 रोजी पोलिस कॉन्स्टेबल शरद देवीदास मावडे, पोलिस कॉन्स्टेबल रत्नपारखी व पोलिस हवालदार शिंदे हे नॉन बेलेबल वॉरंट बजावणीसाठी गेले असता वॉरंटमधील आरोपी मारुती गावडे याच्या मुलाने पोलिसाना त्याचे वडील पुणे येथे दवाखान्यात अ‍ॅडमीट असल्याचे सांगितले. त्याच वेळी शेजारील घरातून एकजण बाहेर आला व आरडाओरडा करू लागला. तसेच पोलिसांच्या दिशेने येवून, तुम्ही विचारणारे कोण, तुमचा काय संबंध? मी एस.पी. सौरभ त्रिपाठीला फोन करतो, पत्रकारांना फोन करून बोलावतो, ए.बी.पी.माझा चॅनलवाल्यांना फोन करून बोलावतो, आता तुमची खैर नाही, तुम्हाला कामाला लावतो, तुमची नोकरी घालवतो…अशी अर्वाच्च भाषा वापरून पोलिस हवालदार शिंदे यांच्या हातातील वॉरंट हिसकावले. अर्धवट फाटलेले वॉरंट त्या व्यक्तीकडून घेत असताना त्याने शरद मावडे यांची गचांडी थरून ढकलून दिले. त्यावेळी रत्नपारखी हे सोडविण्यासाठी आले असता त्यांचादेखील हात पिरगाळून ओटयाच्या खाली ढकलून दिले. त्यानंतर पोलिस हवालदार शिंदे यांनी विचारणा केली असता त्याने त्याचे नाव देवराम मारुती गावडे असे सांगून, तुम्ही माझे काहीही करू शकत नाही, असे म्हणून पोलीस कर्मचारी यांना धमकावून, शिवीगाळ व दमदाटी केली व आजारी असल्याचे नाटक केले. तसेच किसन केशव भुसारी यानेदेखील पोलीस कर्मचार्‍यांना शिवीगाळ व दमदाटी केली. या घटनेबाबत देवराम गावडे व किसन भुसारी यांच्याविरुद्ध पारनेर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. या खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्यावतीने 5 साक्षीदार तपासण्यात आले. व्यायालयासमोर आलेला पुरावा, साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राहय धरून देवराम गावडे याला सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिक्षा ठोठावली. या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मोहन कुलकर्णी यांनी काम पाहिले. त्यांना सहायक फौजदार ए. के. भोसले यांनी सहकार्य केले.

COMMENTS