संगमनेर : बँकिंग व्यवसाय हा अत्यंत काळजीचा विषय आहे. बँकिंग मध्ये ग्राहक आणि नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे असते. अमृतवाहिनी सहकारी बँकेने आपल्या चांगल्या कामातून हा विश्वास सार्थ ठरवला आहे. सर्व आधुनिक प्रणालींचा वापर करून ग्राहकांना चांगल्या सुविधा देत बँकेने 1200 कोटींचा केलेल्या व्यवसाय हा कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या बिझनेस समिट 2026 या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आ.डॉ.सुधीर तांबे, बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, व्हाईस चेअरमन ऍड.नानासाहेब शिंदे, बाबासाहेब ओहोळ यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. थोरात म्हणाले की, बँकेमध्ये 706 कोटींच्या ठेवी असून बँकेने एकूण 1200 कोटींचा केलेला व्यवसाय हा अत्यंत कौतुकास्पद आहे. संगमनेर तालुक्यातील बँकांमधून सुमारे 10 हजार कोटींच्या ठेवी असून हे चांगले अर्थव्यवस्थेचे लक्षण आहे. चेअरमन सुधाकर जोशी म्हणाले की, यावर्षी 22.2 टक्के गतीने वाढ झाली आहे. ढोबळ नफा 11 कोटी 17 लाख रुपये असून निवड नफा 8 कोटी 1 लाख रुपये आहे. तर नेट एनपीए 0 टक्के आहे. बँकेच्या 11 शाखा कार्यरत असून ट्रेझरी मधून 52 लाख रुपयांचा नफा बँकेला मिळाला आहे. ग्राहकांचा विश्वास आणि प्रेम याचबरोबर डिजिटल प्लॅटफॉर्म मधून दररोज किमान दीड ते दोन कोटींचे व्यवहार होत असून 1 वर्षात 500 कोटींचा डिजिटल ट्रांजेक्शन होत असल्याचे ते म्हणाले. येणाऱ्या वर्षांमध्ये पाच शाखा नवीन सुरू होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संगमनेर : बँकिंग व्यवसाय हा अत्यंत काळजीचा विषय आहे. बँकिंग मध्ये ग्राहक आणि नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे असते. अमृतवाहिनी सहकारी बँकेने आपल्या चांगल्या कामातून हा विश्वास सार्थ ठरवला आहे. सर्व आधुनिक प्रणालींचा वापर करून ग्राहकांना चांगल्या सुविधा देत बँकेने 1200 कोटींचा केलेल्या व्यवसाय हा कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या बिझनेस समिट 2026 या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आ.डॉ.सुधीर तांबे, बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, व्हाईस चेअरमन ऍड.नानासाहेब शिंदे, बाबासाहेब ओहोळ यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, बँकेमध्ये 706 कोटींच्या ठेवी असून बँकेने एकूण 1200 कोटींचा केलेला व्यवसाय हा अत्यंत कौतुकास्पद आहे. संगमनेर तालुक्यातील बँकांमधून सुमारे 10 हजार कोटींच्या ठेवी असून हे चांगले अर्थव्यवस्थेचे लक्षण आहे. चेअरमन सुधाकर जोशी म्हणाले की, यावर्षी 22.2 टक्के गतीने वाढ झाली आहे. ढोबळ नफा 11 कोटी 17 लाख रुपये असून निवड नफा 8 कोटी 1 लाख रुपये आहे. तर नेट एनपीए 0 टक्के आहे. बँकेच्या 11 शाखा कार्यरत असून ट्रेझरी मधून 52 लाख रुपयांचा नफा बँकेला मिळाला आहे. ग्राहकांचा विश्वास आणि प्रेम याचबरोबर डिजिटल प्लॅटफॉर्म मधून दररोज किमान दीड ते दोन कोटींचे व्यवहार होत असून 1 वर्षात 500 कोटींचा डिजिटल ट्रांजेक्शन होत असल्याचे ते म्हणाले. येणाऱ्या वर्षांमध्ये पाच शाखा नवीन सुरू होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS