मुंबई : लोकशाही पत्रकार संघ आयोजित राज्यस्तरीय सहविचार बैठक व पत्रकार प्रशिक्षण मेळावा काल बदलापूर, मुंबई येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी

मुंबई : लोकशाही पत्रकार संघ आयोजित राज्यस्तरीय सहविचार बैठक व पत्रकार प्रशिक्षण मेळावा काल बदलापूर, मुंबई येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला बदलापूर शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, मुंबई हायकोकोर्टाचे निवृत न्यायाधीश, कायदेतज्ज्ञ संतोषकुमार जयस्वालजी, बदलापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनजी पाटील, लोकशाही पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भागवतराव वैद्य, राष्ट्रीय उपाध्यक्ष संदिपजी जाधव, प्रदेशाध्यक्ष प्रतापराव साळुंखे, युवा अध्यक्ष किशोरजी पवार, राज्य युवा धोरण समिती सदस्या तथा विधानमंडळ मीडिया सल्लागार विधी पळसापुरे,राष्ट्रीय उपाध्यक्ष निलोफर शेख,प्रदेश उपाध्यक्ष वसीम आजाद,प्रदेश उपाध्यक्ष पन्ना कोडितकर,प्रदेश उपाध्यक्ष राजेश जाधव, व राज्यभरातून आलेले प्रमुख पदाधिकारी वेगवेगळ्या विभागा, अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
या कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष भागवत वैद्य यांनी संघटनेची भूमिका आणि भविष्यातील दिशा स्पष्ट करताना पत्रकारांना संघटित होण्याचे आवाहन केले. तर या मेळाव्यात राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी दिलेले सखोल आणि प्रभावी मार्गदर्शन हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षणबिंदू ठरला. संदीप जाधव यांनी आपल्या भाषणात आजच्या डिजिटल युगातील पत्रकारितेचे बदलते स्वरूप, माध्यमांची जबाबदारी आणि पत्रकारांनी स्वीकारायची व्यावसायिक शिस्त यावर अत्यंत स्पष्ट आणि ठोस मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आजच्या काळात पत्रकार फक्त बातमी देणारा नसून समाजाचा विचार घडवणारा असतो. त्यामुळे सत्य, निष्पक्षता आणि जबाबदारी ही पत्रकाराची खरी ओळख असली पाहिजे. तसेच त्यांनी संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. युवा अध्यक्ष किशोर पवार यांनी युवा पत्रकारांना प्रेरित करताना नव्या तंत्रज्ञानाचा वापर, सोशल मीडिया कौशल्य आणि आधुनिक पत्रकारितेतील संधी यावर प्रकाश टाकला. त्यांनी युवकांनी पुढाकार घेऊन पत्रकारितेत नवीन उंची गाठण्याचे आवाहन केले. तर प्रदेशाध्यक्ष प्रतापराव साळुंखे यांनी राज्यस्तरावर संघटनेचा विस्तार, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच राज्याच्या कानाकोपर्यातून आलेले विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक भव्य आणि प्रभावी ठरला. एकजुट पत्रकारांची ताकद सत्याची या घोषवाक्याला साजेसा हा मेळावा पत्रकारांना नवचैतन्य देणारा ठरला. लोकशाही पत्रकार संघ येत्या काळात पत्रकारांच्या हक्कांसाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करणार असल्याचा दृढ संकल्प यावेळी या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.

COMMENTS