Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खरातच्या कार्यालयाची एसआयटीने घेतली झाडाझडती

मुंबई : लैगिंक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला तथाकथित कॅप्टन अशोक खरातच्या कार्यालयात गुरूवारी एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाने छापा टाकत सखोल तपासण

खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय; न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी
भोंदूगिरीविरोधात कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
खरातच्या ईशान्येश्‍वर मंदिराचा विकास शासकीय निधीतून; माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचा गंभीर आरोप

मुंबई : लैगिंक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला तथाकथित कॅप्टन अशोक खरातच्या कार्यालयात गुरूवारी एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाने छापा टाकत सखोल तपासणी केली. संशयित कार्यालयाचे शटर उघडताच पथकाने आत प्रवेश करून प्रत्येक कोपर्‍याची बारकाईने पाहणी केली. या ठिकाणीच अनेक महिलांचे शोषण झाल्याचा आरोप असल्याने या कारवाईकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.
तपासादरम्यान विविध कागदपत्रे, नोंदी आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आले असून त्यातून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधित कार्यालय अधिकृतरीत्या सील करण्यात आले. या कारवाईमुळे खरातच्या कारभाराचा व्यापक पट उलगडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. न्यायालयाने अशोक खरात याला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण अधिकच संवेदनशील बनले आहे. गेल्या काही दिवसांत तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, पुढील काळात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपासाचा फोकस आता आर्थिक व्यवहारांकडेही वळवण्यात आला आहे. खरातच्या ‘शिवनिका’ संस्थेचे बँक खाते गोठवण्यात आले असून, त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. जमीन, घरे, दुकाने आदी मालमत्तांची चौकशी करण्यासाठी नोंदणी विभागाच्या माध्यमातून राज्यभरात माहिती मागवण्यात आली आहे. या प्रकरणात कोट्यवधी रुपयांची उलाढाल उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतकी मोठी संपत्ती उभी करण्यामागील आर्थिक स्रोत काय, याचा तपास सध्या केंद्रस्थानी आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत तपासाला आणखी गती मिळण्याची शक्यता असून, या प्रकरणातील सत्य अधिक स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.

COMMENTS