Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भोंदूगिरीविरोधात कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच बुधवारी दोन्ही सभागृहांत कामकाजाला वेग आला असताना विविध महत्त्वाच्या

खरातच्या कार्यालयाची एसआयटीने घेतली झाडाझडती
खरातच्या ईशान्येश्‍वर मंदिराचा विकास शासकीय निधीतून; माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचा गंभीर आरोप
खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय; न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच बुधवारी दोन्ही सभागृहांत कामकाजाला वेग आला असताना विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा रंगली. विधानसभेने भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक मंजूर केल्यानंतर अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना अनेक गंभीर मुद्दे पुढे आले. यामध्ये अंधश्रद्धा, भोंदूगिरी, तसेच अलीकडील काही घटनांवरून राजकीय वातावरण तापले.
अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील काही लोकप्रतिनिधींनी भोंदूगिरीकडे वळल्याचा गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली. अंधश्रद्धा आणि जादूटोण्यासारख्या गोष्टींना प्रोत्साहन मिळत असल्यास समाज कुठे चालला आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संतांच्या विचारांनी समृद्ध असलेल्या महाराष्ट्रात अशा प्रवृत्ती वाढणे चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले. या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम भूमिका मांडली. भोंदूगिरीला कुठेही थारा दिला जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले. ज्या कोणाकडे या संदर्भात माहिती असेल, त्यांनी ती शासनापर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले. दोषींवर कठोर कारवाई करून समाजात धाक निर्माण केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, या घटनेचा तपास संबंधित यंत्रणेकडून सुरू आहे. प्राथमिक अहवालानुसार विमानात स्फोटक पदार्थाचा कोणताही अंश आढळलेला नाही. त्यामुळे अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. याच वेळी ‘डिजिटल अटक’ नावाने सुरू असलेल्या फसवणुकीवरही त्यांनी भाष्य केले. कायद्यात अशा कोणत्याही प्रकारची तरतूद नसल्याने नागरिकांनी अशा फोन कॉल्सना बळी पडू नये, असे त्यांनी सांगितले. अशा प्रकारच्या फसवणुकीची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. जादूटोणा विरोधी कायद्याबाबत बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, या कायद्याचे नियम अंतिम टप्प्यात असून त्याला आवश्यक मान्यता मिळाली आहे. नियम पूर्णपणे लागू होण्याआधीही कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा उल्लेख करत अंधश्रद्धेविरोधातील त्यांच्या शिकवणीची आठवण करून दिली. समाजात श्रद्धा टिकवून ठेवताना अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीला आळा घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. संतांच्या विचारांचा आदर्श ठेवून समाजाने योग्य दिशा निवडावी, असेही ते म्हणाले.

COMMENTS