Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीदत्त शिखर संस्थानवर षोडशी कार्यक्रम भक्तीभावात साजरा; आचार्य महामंडलेश्वर अवधेशानंद गिरीजी महाराज यांची उपस्थिती

माहूर : श्रीदत्त शिखर संस्थान येथे ब्रह्मलीन प. पू. महंत मधुसूदनजी भारती महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवारी (दि. 19 एप्रिल) षोडशी पूजेचे आयो

पाथर्डी जैन समाजाच्या वतीने मधुरा भंडारींचे स्वागत
देवळाली प्रवरा येथे श्रीराम कथेचे आयोजन
ईश्वर मानायचा नाही तर जाणायचा – सुश्री वैष्णवी भारतीजी

माहूर : श्रीदत्त शिखर संस्थान येथे ब्रह्मलीन प. पू. महंत मधुसूदनजी भारती महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवारी (दि. 19 एप्रिल) षोडशी पूजेचे आयोजन अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडले. या महत्त्वपूर्ण धार्मिक कार्यक्रमास आचार्य महामंडलेश्वर प. पू. अवधेशानंद गिरीजी महाराज (जुना आखाडा) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी कुंभमेळ्याचे प्रमुख महामंत्री प. पू. श्रीहरी गिरीजी महाराज, प. पू. श्री प्रेम गिरीजी महाराज तसेच सभापती प. पू. मोहन शास्त्रीजी महाराज यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान संस्थानच्या वतीने धर्मसभेच्या व्यासपीठावरील सर्व संत-महंतांचा यथोचित सत्कार करण्यात आला. आचार्य अवधेशानंद गिरीजी महाराज यांनी सुमारे एक तास प्रभावी प्रवचन करत दत्तभक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले. त्यांच्या वाणीतून भक्ती, साधना आणि धर्माचरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. ब्रह्मलीन महंत प. पू. मधुसूदनजी भारती महाराज यांचे 4 एप्रिल रोजी महाप्रयाण झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महंत प. पू. डॉ. धनेश्वरजी भारती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या षोडशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक सोहळ्यास साधू-संत, महंत आणि हजारो दत्तभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. धर्मसभेनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तसेच रात्री महापूजेचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी सकाळी काकडा आरतीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. कार्यक्रमादरम्यान भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी सेवेकर्‍यांनी मनोभावे सेवा बजावली.

COMMENTS