Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

तामिळनाडूत ‘थलपती’ युगाचा उदय! सुपरस्टार विजय यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; ६० वर्षांची ‘द्रविडी’ सत्ता संपुष्टात!

चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात आज एका सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या जाणाऱ्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. सुपरस्टार सी. जोसेफ विजय, ज्यांना जग

संविधानिक मध्यस्थाच्या निष्पक्षतेवर शंका !
तमिळनाडूत सत्ता स्थापनेचा पेच कायम भाजपने दबावाच्या चर्चा फेटाळल्या
तामिळनाडूत 30 आमदार फुटीच्या उंबरठ्यावर; विजयला पाठिंबा देण्यावरून अण्णाद्रमुकमध्ये फूट ?
TVK प्रमुख जोसेफ विजय बनले तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री, नेहरू स्टेडिमयवर  घेतली पदाची शपथ

चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात आज एका सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या जाणाऱ्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. सुपरस्टार सी. जोसेफ विजय, ज्यांना जग ‘थलपती’ म्हणून ओळखते, त्यांनी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आज जनसागराच्या साक्षीनं हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ६० वर्षांनंतर पहिल्यांदाच तामिळनाडूच्या सत्तेतून DMK आणि AIADMK या दोन मोठ्या द्रविडी पक्षांची पकड सैल झाली असून, विजय यांच्या ‘तामिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाने सत्तेची सूत्रे हाती घेतली आहेत.
या सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. विजय यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर ९ मंत्र्यांनीही शपथ घेतली. शपथ घेताना सुपरस्टार विजय भावूक झालेले पाहायला मिळाले. त्यांच्या या प्रवासाने साऊथचे सुपरस्टार एम.जी. रामचंद्रन यांच्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत.
मात्र, या आनंदाच्या सोहळ्यात राजकीय टीकेचे बाणही सुटले आहेत. भाजपने विजय यांच्या राजकारणातील प्रवेशावर उपरोधिक टीका करत, हा त्यांचा ‘खऱ्या आयुष्यातील अभिनय’ असल्याची टिप्पणी केली आहे. दुसरीकडे, चाहत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मात्र विजयाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
शपथविधी पार पडताच मुख्यमंत्री विजय यांनी थेट कामाला सुरुवात केली. त्यांनी तीन महत्त्वाच्या फाईल्सवर स्वाक्षरी करत जनतेला मोठी आश्वासनं दिली आहेत:

पहिली: घरगुती वापरासाठी दरमहा २०० युनिट्स मोफत वीज.

दुसरी: महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष दलाची स्थापना.

तिसरी: प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची निर्मिती.

दशकांपासून चालत आलेली राजकीय समीकरणं मोडीत काढत थलपती विजय आता तामिळनाडूच्या विकासाचा नवा रथ कसा हाकतात, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS