Homeदेश

टाकीत उतरलेल्या चार सफाई कर्मचार्‍यांचा मृत्यू

सुरत : गुजरातमधील सुरत शहरात भूमिगत सांडपाणी प्रक्रिया टाकीची स्वच्छता करताना विषारी वायूचा फटका बसल्याने चार सफाई कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्याची

सांगलीत निसर्गाचा कोप; जत तालुक्यातील मार्गूदेवी मंदिरात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी अंत.
उल्हासनगरमध्ये चार मजली जर्जर इमारत पत्त्यांसारखी कोसळली, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ आला समोर!
बारामतीमध्ये पुन्हा विमान अपघात; तांत्रिक बिघाडामुळे शेतात कोसळले प्रशिक्षणार्थी विमान, सुदैवाने जीवितहानी टळली


सुरत : गुजरातमधील सुरत शहरात भूमिगत सांडपाणी प्रक्रिया टाकीची स्वच्छता करताना विषारी वायूचा फटका बसल्याने चार सफाई कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली. खांड बाजार परिसरातील एका सराफा प्रतिष्ठानात ही दुर्घटना घडल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रतिष्ठानाच्या भूमिगत सांडपाणी प्रक्रिया टाकीची स्वच्छता सुरू होती. यावेळी एक कामगार टाकीत उतरला असता त्याला विषारी वायूचा त्रास होऊन तो आत अडकला. त्याला बाहेर काढण्यासाठी आणखी दोन कामगार टाकीत उतरले; मात्र तेही वायूच्या प्रभावामुळे बेशुद्ध झाले. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर पर्यवेक्षकाने मदतीसाठी धाव घेतली, परंतु बचावाचा प्रयत्न करताना तोही टाकीत अडकला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य राबवून चौघांनाही बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीनंतर चौघांनाही मृत घोषित केले. मृतांमध्ये निमेष विठ्ठलभाई सावलिया (वय 26), विकासकुमार संतोषभाई सोनावणे (वय 24), विजय भीखाभाई आहिरे (वय 24) आणि योगेश नानाभाई जादव यांचा समावेश आहे. अग्निशमन विभागाच्या प्राथमिक पाहणीत धक्कादायक बाब समोर आली आहे. टाकीत उतरलेल्या कोणत्याही कामगाराकडे संरक्षक पोशाख, श्‍वसन यंत्रणा किंवा इतर आवश्यक सुरक्षा साधने नव्हती. घटनास्थळीही पुरेशी सुरक्षा व्यवस्था आढळून आली नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे या दुर्घटनेमागे निष्काळजीपणाचा गंभीर मुद्दा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS