एक लाख लोकांनी सूर्यनमस्कारातून केली राष्ट्रवंदना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एक लाख लोकांनी सूर्यनमस्कारातून केली राष्ट्रवंदना

।संगमनेर, प्रतिनिधी : २७ वेदांनी संपूर्ण वसुंधरेलाच आपली जननी मानले आहे. परंतु, त्यातही भारतमातेचे विशेष स्थान आहे. जे आपल्या देशाच्या मातीत आहे ते क

दि फ्रेंड्स ऑफ डिप्रेस्ड लीग संस्थेस ‘शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार’
जलजीवन मिशन योजने अंतर्गत कामाची चौकशी करावी
संगमनेरात अत्याचार करून महिलेचा खून ; अवघ्या ४८ तासात आरोपी गजाआड

।संगमनेर, प्रतिनिधी : २७ वेदांनी संपूर्ण वसुंधरेलाच आपली जननी मानले आहे. परंतु, त्यातही भारतमातेचे विशेष स्थान आहे. जे आपल्या देशाच्या मातीत आहे ते केवळ अद्भूत आहे. विभिन्न प्रकारचे सृष्टीसौंदर्य आणि समृद्धीने नटलेल्या आपल्या देशाला म्हणूनच ‘सोने की चिडिया’ म्हटले गेले आहे. समृद्धीसोबतच आपल्या देशाने निर्माण केलेल्या संस्कृती समोरही अवघं विश्‍व आपोआपच नतमस्तक होते. आपल्या भूमीतील तक्षशिला, नालंदा सारख्या विश्‍वविद्यालयांनी ज्ञानाचा आलोक पसरविला आहे. अशा या महान देशाला राष्ट्रवंदना करतांना स्वातंत्र्य संग्रामात आपाल्या प्राणांची आहुती देणार्‍या क्रांतिकारकांचे स्मरण आवश्यक असल्याचे प्रतिपादन गीता परिवाराचे संस्थापक तथा श्रीराम जन्मभूमी न्यासाचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने गीता परिवार, क्रीडा भारती, पतंजली योगपीठ, हार्टफुलनेस इंस्टिट्युट व राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशन या संस्थांनी ७५ कोटी सूर्यनमस्कार घालून विश्वविक्रम नोंदविण्याचा संकल्प केला आहे. दि.१ जानेवारीपासून सुरु झालेल्या या राष्ट्रीय उपक्रमात प्रजासत्ताक दिनी देशभरातील साडेसातशे केंद्रांच्या माध्यमातून एका लाखांहून अधिक जणांनी एकाचवेळी सूर्यनमस्कार घालून अभिनव पद्धतीने राष्ट्रवंदना केली. या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी स्वामीजी बोलत होते. यावेळी योगमहर्षी स्वामी रामदेव महाराज, पतंजली योगपिठाचे केंद्रीय प्रभारी डॉ.जयदीप आर्य, राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशनचे अध्यक्ष उदित सेठ, गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, क्रीडा भारतीचे मिलिंद डांगे व हार्टफुलनेस इन्स्टिट्युटच्या श्रीमती एकता बुडैरलिक आदी उपस्थित होते. 

COMMENTS