Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या रोड रोमिओस अटक

अहमदनगर/प्रतिनिधी ः हॉटेल थापर्स इन अ.नगर कडे जाणार्‍या तारकपुर बस स्टॅण्डचे शेजारील रोडवर अल्पवयीन मुलीची छेडछाड करणार्‍या इसमास ताब्यात घेवु

संगमनेरात  थोरात सहकारी साखर कारखानाच्या गळीत हंगामांची सांगता
सोमवार 11 ऑक्टोबर रोजी संगमनेर बंद
मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी ः हॉटेल थापर्स इन अ.नगर कडे जाणार्‍या तारकपुर बस स्टॅण्डचे शेजारील रोडवर अल्पवयीन मुलीची छेडछाड करणार्‍या इसमास ताब्यात घेवुन त्यावर निर्भया पथक भरोसा सेलच्या पथकाने कारवाई केली.
या बाबतची हकिकत अशी की,भरोसा सेल प्रभारी अधिकारी यांना राधाबाई काळे महिला महाविदयालयाचे प्राचार्य यांनी फोन करुन एक इसम विदयालयाकडे येणाच्या रस्त्यावर उभा राहुन विदयालयात येणा-या विदयार्थिनींची छेड काढुन त्यांना त्रास देत असले बाबत कळविले. प्रभारी अधिकारी भरोसा सेल व निर्भया पथकातील कर्मचारी यांनी राधाबाई काळे महिला महाविदयालयात जावुन तेथील विदयार्थिनींची भेट घेवुन त्यांचेशी चर्चा करुन त्यांना निर्भया पथक व भरोसा सेलचा संपर्क नंबर देवुन काही तक्रार असेल तर व पुन्हा तो इसम त्यांना दिसल्यास त्याबाबत कळविण्याबाबत सांगितले.
या वरून भरोसा/निर्भया सेलच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक पल्लवी देशमुख व निर्भया पथकातील अंमलदार पोलिस हवालदार. बी.बी. पोकळे, चालक पोलिस नाईक. एस.व्ही. कोळेकर, महिला पोलिस नाईक के. एस.खेडकर यांनी हॉटेल थापर्स इन नगर कडे जाणारा तारकपुर बस स्टॅण्डचे शेजारील रोडवर सापळा लावुन थांबले असता विदयार्थिनींना त्रास देणारा इसम तेथे आला त्या इसमास विदयार्थिनींनी पाहिले व लगेच निर्भया पथकाचे संपर्क क्रमांकावर संपर्क करुन तो इसम महाविदयालयाचे रोडवर आला असले बाबत कळविल्याने लागलीच प्रभारी अधिकारी भरोसा सेल व निर्भया पथकाने त्या इसमास ताब्यात घेतले. तक्रार देणार्‍या विदयार्थिनींना हा तोच इसम आहे का? याबाबत विचारणा केली असता त्यांनी हा तोच इसम आहे जो आमची छेड काढुन आम्हाला त्रास देतो असे सांगितल्याने त्या इसमास त्याचे नाव पत्ता बाबत विचारणा केली असता त्याने त्याचे नाव फरहान शौकत अली शेख ( वय 36 वर्षे, रा. आलमगीर मदरसा पाठीमागे आलमगीर, भिंगार ) असे असल्याचे सांगितले. त्या इसमाविरूद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात भा.द.वि.का कलम 354, 354 (अ ), 354 (ड ), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

COMMENTS