Homeताज्या बातम्या

तळवट बोरगाव येथील शिवरायांच्या पुतळा प्रकरणी अशोक घोलप यांना अटकपूर्व जामीन मंजूर; न्यायालयाचा दिलासा

गेवराई : बीड जिल्ह्यातील तळवट बोरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा आवश्यक शासकीय परवानगी न घेता सार्वजनिक जागेवर उभारल

चकलांबा येथे भारती बांगर इंटरनॅशनल स्कूलची बस सेवा सुरू; पालकांकडून शाळेचे आभार
शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट; गेवराई तालुक्यातील देवीतांडा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
मुख्यमंत्री फडणवीस व मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर; ७१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

गेवराई : बीड जिल्ह्यातील तळवट बोरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा आवश्यक शासकीय परवानगी न घेता सार्वजनिक जागेवर उभारल्याप्रकरणी नोंद झालेल्या गुन्ह्यातील आरोपी अशोक बाबासाहेब घोलप यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. आर. एस. खुणे यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला.

तलवाडा पोलीस ठाण्यात ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र तुकाराम घमाट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तळवट बोरगाव येथील हनुमान मंदिरालगतच्या सार्वजनिक व शासकीय जागेवर कोणतीही रीतसर परवानगी न घेता हा पुतळा उभारण्यात आला होता. या अनधिकृत बांधकामामुळे सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण झाल्याचा आरोप करत तक्रारीत विकास गाडे, बंडू घोलप, किरण गाडे, अशोक घोलप यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी अशोक बाबासाहेब घोलप यांनी ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ (BNSS) कलम ४८२ अंतर्गत अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. सुनावणीदरम्यान अ‍ॅड. खुणे यांनी न्यायालयात पटवून दिले की, या प्रकरणात आरोपीकडून कोणतीही जप्ती किंवा पोलिसांना कोठडीत घेऊन चौकशी करण्याची आवश्यकता नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अ‍ॅड. खुणे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत अशोक घोलप यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणाचा पुढील तपास तलवाडा पोलीस करत आहेत.

COMMENTS