Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा अटकेत

मुंबई ः चेंबूर येथे पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 20 वर्षीय तरूणाला आरसीएफ पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात बलात्कार व बालक

ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी मागितले अडीच कोटी
पोटच्या पोरीनच आईला संपवलं.
फडणवीसी फटका !

मुंबई ः चेंबूर येथे पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 20 वर्षीय तरूणाला आरसीएफ पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अपहाराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी सार्वजनिक शौचालयात गेली होती. त्यावेळी आरोपी तिच्या मागावर होता. तेथे कोणी नसल्याचे पाहून आरोपीने मुलीवर अत्याचार केला. पीडित मुलीच्या आईला हा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी तात्काळ याप्रकरणी पोलीस नियंत्रण कक्षाला दूऱध्वनी केला. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यानंतर महिलेने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून बलात्कार व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले असून तिची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

COMMENTS