शिक्षकांमधील विषमता दूर करणार – आ.कपिल पाटील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षकांमधील विषमता दूर करणार – आ.कपिल पाटील

अहमदनगर (प्रतिनिधी)- काही शिक्षकांना मोठा पगार तर काहींना तुटपुंजा पगार अशी शिक्षकांमधील विषमता दूर करण्यासाठी शिक्षक भारती पाठपुरावा करीत आहे. व

शिर्डीतील साईबाबा मंदिराला अनंत अंबानींची दीड कोटींची देणगी
प्रा. दिलीप सोनवणे यांना संत गोरा कुंभार साहित्य पुरस्कार प्रदान
प्रहार च्या संघटकपदी तिपायले यांची नियुक्ती


अहमदनगर (प्रतिनिधी)-

काही शिक्षकांना मोठा पगार तर काहींना तुटपुंजा पगार अशी शिक्षकांमधील विषमता दूर करण्यासाठी शिक्षक भारती पाठपुरावा करीत आहे. विनाअनुदानित हा शब्द कायमचा रद्द करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी यांना नियमीत पगार सुरु झाला पाहिजे, यासाठी शिक्षक भारतीने लढा पुकारला आहे. लवकरच तो पूर्णत्वास नेऊ, असे आश्वासन शिक्षक भारती संघटनेचे संस्थापक व शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी दिले.
विधान परिषद सदस्यत्वाची पंधरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आमदार पाटील यांचा तसेच आदर्श शिक्षक पुरस्काप्राप्त शिक्षकांचा सत्कार राज्य प्राथमिक शिक्षक भरती चे उपाध्यक्ष दिनेश खोसे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा अध्यक्ष मुकेश गडदे, जिल्हा सरचिटणीस सुनील मते, महिला अध्यक्षा सौ.उषाताई येणारे व संपूर्ण जिल्हा कार्यकारणी शिक्षक भारती सभासद यांच्या सहकार्यातून करण्यात आला. अध्यक्षस्थानी राष्ट्रसेवा दलाचे राज्याध्यक्ष अर्जुनराव कोकाटे होते. आमदार पाटील म्हणाले की शिक्षक भारतीचा लढा शिक्षकांच्या सन्मानासाठी आहे. शिक्षकांच्या पगारात मोठी तफावत आहे. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे विनाअनुदानित हा शब्दच हद्दपार झाला पाहिजे, यासाठी शिक्षक भारतीचा लढा सुरु आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना पूर्व प्राथमिक शिक्षकाचा दर्जा मिळाला पाहिजे, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु आहे. आशा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्नही सोडविण्यावर भर देणार आहे. तरुणांच्या नोकऱ्यांचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. कोरोना काळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. त्यामुळे पुढील काळात तरुणांच्या रोजगारासाठी योजनाबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नगर जिल्हा शिक्षक बँकेची निवडणूक शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी लढवावी. परंतु त्यासाठी स्वतंत्र मंडळ तयार करावे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, राज्य उपाध्यक्ष दिनेश खोसे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष मुकेश गडदे, जिल्हा सरचिटणीस सुनील मते, महिला अध्यक्षा उषाताई येणारे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, राज्य सरचिटणीस भरत शेलार, उपाध्यक्ष किशोर कदम, विनोद कडव, पप्पू मुलानी, शिवाजीराव खुडे, सुर्यभान काळे, प्रकाश दाने, स्वाती बेडभर, मंगेश भांगरे, चांगदेव काकडे, हिराताई गाडे, संदीप कातकडे, हरिभाऊ सहाने, सुरेश सरगर, कैलास लेंभे, ज्ञानदेव कुसळकर, नाना बागल, मंदाकिनी भोसले, संदीप काळे, रोहिदास गावडे, शोभा वाणी आदी उपस्थित होते
जिल्ह्यात ३१२ बालभवन केंद्र
नगर जिल्हा हा राष्ट्रसेवा दल व सत्यशोधक चळवळींचा बालेकिल्ला होता. त्यामुळे जिल्ह्यातील बालकांवर देशभक्तीचे संस्कार रुजवावेत, यासाठी जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक भरतीचे राज्य उपाध्यक्ष दिनेश खोसे यांच्या कल्पनेतून ३१२ साने गुरुजी बालभवन केंद्र सुरु करण्यात आले आहे.

COMMENTS