Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ब्राह्मणगाव केंद्राकडून गोल्डन कार्ड काढण्याचे काम सुरू

कोपरगाव शहर ः आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांना आरोग्य संबधी वैद्यकीय उपचार मोफत मिळावे या उद्देशाने केंद्र शासन व राज्य शासनाने साध्य तरी शुभ्र

भटकंती करणारांच्या पालावर झाले रक्षाबंधन ;कामरगावच्या रहिवाशांचा अनोखा उपक्रम
पोलिस नियंत्रण कक्षातील महिला पोलिसाची आत्महत्या
कांद्याला एक रुपये भाव मिळाल्याने शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

कोपरगाव शहर ः आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांना आरोग्य संबधी वैद्यकीय उपचार मोफत मिळावे या उद्देशाने केंद्र शासन व राज्य शासनाने साध्य तरी शुभ्र रेशन कार्ड वगळता इतर सर्व नागरिकांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रतिवर्षी प्रतिकुटूंब 5 लाख रुपये पर्यंतचा विमा कवच देण्यात येत असून त्यासाठी प्रत्येक नागरिकाने ई-केवायसी करत मोफत गोल्डन कार्ड काढून घेणे गरजेचे असून यासाठी संपूर्ण राज्यातील शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून गावोगावी वेगवेगळ्या प्रकारे कॅम्पचे आयोजन करत पात्र लाभार्थ्यांचे गोल्डन कार्ड काढून दिले जात आहे. त्याच अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत खोत आणि डॉ. असेफा पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ब्राम्हणगावचे सरपंच अनुराग येवले यांच्या सहकार्याने आरोग्यवर्धिनी उपकेंद्र ब्राम्हणगाव द्वारे गावातील वाडी वस्तीवर जाऊन रात्री उशिरापर्यंत आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
खेडेगावातील अनेक नागरिक दिवसभर शेतात कामाला जात असतात त्यामुळे त्यांना दिवसा कार्ड काढायला वेळ मिळत नसल्याचे लक्ष्यात आल्याने प्रशासनाच्या मार्गदर्शनाली ब्राह्मणगाव आरोग्य वर्धिनीने हा अभिनव उपक्रम  राबवत असून या उपक्रमास नागरिकांचा देखील प्रतिसाद लाभला आहे. या उपक्रमास आरोग्यसेविका समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. संकेत पोटे, सरिता मैद, आरोग्यसेवक  एस.बी. गावडे, आशा सेविका वैशाली कुमावत, नंदा लोखंडे, अलका अष्टेकर, मनीषा बंड, पूनम कडवे, सोनाली बर्डे, शीला पाईक, लीला सहानखोरे, शीतल महाजन, सविता मोरे  आदीं अथक परिश्रम घेत आहे.

COMMENTS