किनवट : सकारात्मक विचार, कामाप्रती प्रामाणिकता आणि मेहनतीची तयारी असेल, तर यश नक्कीच तुमच्या पाठीशी येते, असे प्रेरणादायी प्रतिपादन कु. ज्ञानदा च

किनवट : सकारात्मक विचार, कामाप्रती प्रामाणिकता आणि मेहनतीची तयारी असेल, तर यश नक्कीच तुमच्या पाठीशी येते, असे प्रेरणादायी प्रतिपादन कु. ज्ञानदा चतुरंग कांबळे यांनी केले. जरूर येथील शाखा डाकपाल म्हणून कार्यरत असलेल्या ज्ञानदा यांची खात्यांतर्गत परीक्षेत यश मिळवून मुंबई येथे ’बहुकार्य सेवा कर्मचारी’ पदावर पदोन्नती झाली आहे. या गौरवपूर्ण यशानंतर मांडवी उप डाकपाल कार्यालयाच्या वतीने त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप डाकपाल सुरेश वाघमारे होते. त्यांनी ज्ञानदा यांच्या कौशल्याचे कौतुक करताना सांगितले की, अत्यंत कमी वयात आणि कमी कालावधीत ज्ञानदाने डाक सेवेची जबाबदारी चोख बजावली. अतिदुर्गम अशा ’जरूर’ भागातून अभ्यास सांभाळून राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत पदोन्नती मिळवणे, ही अभिमानास्पद बाब आहे. त्या भविष्यात मोठ्या अधिकारी होऊन पुन्हा स्वजिल्ह्यात सेवेसाठी येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी सर्व कर्मचार्यांच्या वतीने पळशीच्या ज्येष्ठ शाखा डाकपाल तुळसाबाई पुसनाके यांच्या हस्ते ज्ञानदा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्ञानदाने मोठी अधिकारी होऊन मी सेवानिवृत्त होण्यापूर्वी आपल्या भागात पुन्हा यावे, अशी भावनिक अपेक्षा पुसनाके यांनी यावेळी व्यक्त केली. या सोहळ्याला डाक विभागातील अनेक मान्यवर आणि सहकारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने: दिनेश दासरवार (मांडवी) अस्मित वाघमारे (दरसावंगी), रवि दासरवार (जवारला), धिरज लखन राठोड (कनकी) नरसय्या पदकंठवार (खबाळा), राहुल भुरे (कोठारी), पोचन्ना अटलावार (लिंगी) धर्मेंद्र ठाकूर (नागापूर), अनिता सेगेवाड (निराळा), गजानन पांडे (पाटोदा) गोदाजी पोलासवार (पिंपळगाव), रमेश दासरवार (रायपूर तांडा), रामराव पिटलावार (सक्रु नाईक तांडा) गंगन ना वेडंटी (सिगोडा), करण चव्हाण (उमरी), संतोष नदीकोंडावार (उनकदेव) स्वामी दासरवार (निवृत्त डाक सेवक) या निरोप समारंभाने ज्ञानदा यांच्या नव्या प्रवासाला शुभेच्छा देतानाच, इतर ग्रामीण युवकांसाठी त्या एक आदर्श ठरल्या आहेत, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

COMMENTS