Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किनवटमध्ये ज्वारी-मका नोंदणीचा श्रीगणेशा; सर्वर डाऊन असल्याने ऑनलाईन प्रक्रियेत खोळंबा

किनवट : आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयांतर्गत रब्बी हंगाम 2025-26 साठी ज्वारी आणि मका या भरडधान्याच्या खरेदी प्रक्रिय

बनावट जनगणना अर्जात माहिती भरू नका; राज्य सरकारचे नागरिकांना आवाहन
घरबसल्या ‘स्व-जनगणना’ला नागरिकांचा प्रतिसाद; अचूक माहितीमुळे विकास नियोजनाला गतीनागरिकांनी अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा : तहसीलदार चंद्रकांत शेळके
बोगसगिरीला चाप! व्यापार्‍यांचे धाबे दणाणले; ज्वारी-मका खरेदीत ’केराम पॅटर्न’चा दणका

किनवट : आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयांतर्गत रब्बी हंगाम 2025-26 साठी ज्वारी आणि मका या भरडधान्याच्या खरेदी प्रक्रियेला 20 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. मात्र, शासनाचे पोर्टल सुरू असूनही तांत्रिक कारणास्तव ’सर्वर डाऊन’ असल्याने प्रत्यक्ष ऑनलाईन नोंदणीत अडथळे येत आहेत. परिणामी, सध्या महामंडळाने ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यावर भर दिला आहे.
20 आणि 21 एप्रिल या दोन दिवसांच्या कालावधीत आतापर्यंत 459 शेतकर्‍यांनी आपले ऑफलाइन अर्ज सादर केले आहेत. शेतकर्‍यांचा ओघ पाहता हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 22 एप्रिलपासून आधारचे सर्वर पूर्ववत होण्याची शक्यता असून, त्यानंतर युद्धपातळीवर ऑनलाईन नोंदणी केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एकीकडे नोंदणी सुरू असताना दुसरीकडे पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी शेतात ज्वारीचा पेरा नसतानाही ऑनलाईन नोंदणीसाठी अर्ज दाखल केल्याचा खळबळजनक आरोप काही शेतकर्‍यांनी केला आहे. या ’बोगसगिरी’ला चाप लावण्यासाठी बाबूराव केंद्रे पाटील बोधडीकर आणि उद्धवराव मुंडे पाटील बोधडीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली आहे. ज्या शेतकर्‍यांनी अर्ज केले आहेत, त्यांच्या शेतात प्रत्यक्ष ज्वारी किंवा मका आहे का? याची सखोल चौकशी व्हावी. ग्राम महसूल अधिकार्‍यांचे दाखले आणि 7/12 वरील नोंदींची पारदर्शकता तपासावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. नोंदणी प्रक्रियेला विलंब होत असल्याने शेवटच्या शेतकर्‍याचे धान्य खरेदी केले जाईल की मुदत संपताच केंद्र बंद होणार, याबाबत शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाने सूचना फलकाद्वारे शेतकर्‍यांना संयम ठेवण्याचे आवाहन केले असून, सर्वर सुरू होताच तात्काळ कामाला गती देण्याचे आश्वासन दिले आहे.

COMMENTS