Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरच्या सहाय्यक निबंधकाला लाच स्वीकारताना पकडले

येथील सहकारी संस्था अहमदनगर वर्ग-2 सहाय्यक निबंधक सुदाम रोकडे (रा.भूषणनगर, केडगाव) यांना पन्नास हजार रुपयांची लाच घेताना गुरुवारी (दि.15) कायनेटिक चौकातील जस्ट इन अव्हेन्यु हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडण्यात आले.

थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानसभेत मंजूर
रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करणार्‍या वाहन चालकावर गुन्हा
सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज टाकणाऱ्या एका विरुद्ध गुन्हा दाखल 

अहमदनगर/प्रतिनिधी- येथील सहकारी संस्था अहमदनगर वर्ग-2 सहाय्यक निबंधक सुदाम रोकडे (रा.भूषणनगर, केडगाव) यांना पन्नास हजार रुपयांची लाच घेताना गुरुवारी (दि.15) कायनेटिक चौकातील जस्ट इन अव्हेन्यु हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडण्यात आले. अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

याबाबत समजलेली माहिती अशी की, यातील तक्रारदार (रा.कायनेटिक चौक, नगर-पुणे रोड, अ.नगर ) यांनी एका पतसंस्थेकडून 2014 मध्ये सोने तारण ठेवून 30 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या प्रकरणात पतसंस्थेने तक्रारदारविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार पतसंस्थेच्या कर्जाची सर्व रक्कम भरली असतानाही पतसंस्थेने तक्रारदारविरुद्ध सहकारी पतसंस्था फेडरेशन-अहमदनगर यांच्याकडे कलम 101 नुसार तक्रारदारांकडून वसुलीची कारवाई करण्याचा आदेश मिळण्यासाठी प्रकरण दाखल केले होते. या प्रकरणात आरोपी सुदामरोकडे यांनी तक्रारदार यांचे बाजूने निकाल दिला होता. तक्रारदार यांचे बाजूने निकाल दिला म्हणून त्या मोबदल्यात रोकडे यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपयाची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यावरून लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रोकडे यांनी केलेल्या लाचेच्या  मागणीची पडताळणी केली. गुरुवारी दिनांक 15 रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणीदरम्यान एक लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती पन्नास हजार रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष केली आणि ठरल्याप्रमाणे लाचेची पन्नास हजार रुपये रक्कम कायनेटिक चौकातील जस्ट इन अव्हेन्यूमध्ये घेण्याचे ठरले. त्यानुसार गुरुवारी रोजी कायनेटिक चौक येथील हॉटेल जस्ट इन अव्हेन्युमध्ये लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने लाचेचा सापळा रचला आणि रोकडे यांना लाचेची रक्कम पन्नास हजार रुपये स्वीकारत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई नाशिकचे एससीबीचे अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक सोनवणे व वाचक पोलीस उपअधीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगरचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक शाम पवरे यांच्या पथकाने केली.

COMMENTS