Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बळीराजा संकटात! अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा

https://youtu.be/Khg1Cc3KnXc?si=COgCZIcZslxjLjea अहिल्यानगर : नगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बळीराजा संकटात सापडला असून, साडेतीन हजार

इराण संघर्षामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने : पंतप्रधान मोदी
आरोग्य भरतीतील बिंदू नामावलीत घोटाळा; आमदार पडळकरांचा भाजप सरकारला घरचा आहेर
अटकेपूर्वी खरात सनदी अधिकार्‍यांना भेटला; शिर्डीत भेट घेतलेले ते तीन अधिकारी कोण ?

अहिल्यानगर : नगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बळीराजा संकटात सापडला असून, साडेतीन हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील रब्बी पिके जमीनदोस्त झाली आहेत। नगर, पाथर्डी, राहुरी, नेवासा, अकोले, पारनेर आणि राहाता या तालुक्यांतील काढणीस आलेल्या गहू, हरभरा, मका आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील सुमारे १०३ गावांतील शेतीला गारपिटीचा तडाखा बसला असून, ७ हजारांहून अधिक शेतकरी प्रभावित झाले आहेत. काढणीला आलेला गहू, मका, कांदा आणि द्राक्ष-आंबा यांसारख्या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहेत. नुकसानग्रस्त शेताचे तात्काळ पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. वादळी वारे आणि गारपिटीमुळे उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, पुढील काळातही हवामान बदलाचा धोका कायम आहे. वादळी पावसामुळे काढणीला आलेले पीक आडवे झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडले आहे.

COMMENTS