Homeताज्या बातम्या

धाराशिव-संभाजीनगर रेल्वे मार्गासाठी खा.सोनवणेंनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट मराठवाड्याच्या विकासासाठी पाठपुरावा;

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद बीड: मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार्‍या ’धा

इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत अगस्ती विद्यालयाचे उज्ज्वल यश; बहुसंख्य विद्यार्थी झाले पात्र
देशाला नव्या पक्षापेक्षा व्यापक जनांदोलनाची गरज: अभिजित दिपके
पूर्णवादी बँकेत पारनेरकर महाराजांच्या जन्मतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन; २५ शाखांमधून सामाजिक बांधिलकी

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद

बीड: मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार्‍या ’धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर’ या प्रस्तावित रेल्वे मार्गाला गती मिळण्यासाठी खा.बजरंग सोनवणे यांनी दि.4 ऑगस्ट रोजी नवी दल्लिीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी प्रकल्पाच्या विविध टप्प्यांवर सवस्तिर चर्चा करत प्रशासकीय मंजुरी तातडीने देण्याची मागणी केली. ’धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर’ या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्यापुढील प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, प्रकल्पास अंतिम मंजुरी द्यावी आणि आवश्यक निधीची तरतूद करून प्रत्यक्ष कामाला गती द्यावी, असा आग्रह खा.सोनवणे यांनी धरला.सदरील रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास बीड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर हे तीन महत्त्वाचे जल्हिे थेट रेल्वे नेटवर्कने जोडले जातील. यामुळे केवळ प्रवासी व मालवाहतूक सुलभ होणार नसून उद्योग, व्यापार, शेती, पर्यटन आणि रोजगारनर्मितिीला मोठा हातभार लागेल. मराठवाड्याच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला ही नवी दिशा ठरेल, याकडे खा. सोनवणे यांनी केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले. रेल्वेमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद रेल्वेमंत्री वैष्णव यांनी या मागण्यांची सकारात्मक दखल घेतली असून, नियमानुसार पुढील टप्प्यांना गती देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती खा.बजरंग सोनवणे यांनी दिली. मराठवाड्याच्या विकासासाठी या प्रकल्पाचा सतत पाठपुरावा करत राहण्याचा नर्धिारही त्यांनी व्यक्त केला. प्रशासकीय प्रक्रियेसह निधीची मागणी प्रस्तावित रेल्वे मार्गाचे प्राथमिक व सवस्तिर सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता यापुढील प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, प्रकल्पास अंतिम प्रशासकीय मंजुरी देऊन आगामी अर्थसंकल्पात किंवा विशेष तरतुदीद्वारे आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा आणि प्रत्यक्ष जमिनीवरील कामाला सुरुवात करावी, असा विशेष आग्रह खा.सोनवणे यांचा आहे. तीन जल्ह्यिांचे भाग्य उजळणार धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर हे तीन मोठे जल्हिे या रेल्वे मार्गामुळे थेट एकमेकांशी जोडले जाणार आहेत. सध्या या भागातील प्रवाशांना आणि व्यापार्‍यांना रस्ते वाहतुकीवरच अवलंबून राहावे लागते. हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास प्रवासाचा वेळ आणि खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल.

COMMENTS