बीड: देवगिरी प्रतिष्ठान संचलित व एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ (मुंबई) संलग्न तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, बीड येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या नवाग

बीड: देवगिरी प्रतिष्ठान संचलित व एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ (मुंबई) संलग्न तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, बीड येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या नवागत विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आलेला आठवडाभराचा ‘इंडक्शन प्रोग्राम’ (प्रवेश व स्वागत सोहळा) 17 ते 24 जुलै दरम्यान अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी तुलसी शैक्षणिक समूहाचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा. प्रदीप रोडे उपस्थित होते. नवागत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना प्रा. रोडे म्हणाले की, सध्या फॅशन डिझायनिंग क्षेत्रात रोजगाराच्या अथांग संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी विद्यार्थिनींनी नाविन्यपूर्ण कौशल्ये आत्मसात करून आत्मविश्वासाने पुढे गेले पाहिजे. यावेळी प्राचार्य डॉ. अश्विनी बेद्रे यांनी सर्व नवप्रविष्ट विद्यार्थिनींचे मनापासून स्वागत केले. तसेच त्यांनी संस्थेची उज्ज्वल परंपरा, उपलब्ध शैक्षणिक सुविधा, अभ्यासक्रम आणि वर्षाभरात राबवण्यात येणार्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. आठवडाभर चाललेल्या या कार्यक्रमात विद्यार्थिनींसाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची मार्गदर्शक व्याख्याने, संवादात्मक सत्रे, महाविद्यालय परिसर व विभागनिहाय माहिती, शंका-निरसन सत्रे आणि कौशल्यविकासावर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी हॉलमध्ये डिजिटल डिस्प्लेच्या माध्यमातून आकर्षक सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी नवागत विद्यार्थिनींनी अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया देत संस्थेने दिलेल्या या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, कर्मचार्यांसह नवागत विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

COMMENTS