Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिहारच्या राजकारणात नितीश पर्वाचा अस्त; आमदारकीचा दिला राजीनामा; मुख्यमंत्री कोण होणार?

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी बिहार आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे बिहारच्या राजकारणात नितीश पर्वाचा अस्त झाल्याचे

बिहारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार; निशांत कुमार यांच्यासह ३२ जणांचा शपथविधी
सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री होणारनितीशकुमार सरकार बरखास्त ; राज्यपालांकडे दिला राजीनामा
नितीश युगाचा अस्त!

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी बिहार आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे बिहारच्या राजकारणात नितीश पर्वाचा अस्त झाल्याचे बोलले जात आहे. कारण आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर नितीशकुमार आता राज्यसभेचे खासदार असून पुढील काही दिवसांमध्ये ते मुख्यमंत्रीपदाचा देखील राजीनामा देणार असल्यामुळे पुढील मुख्यमंत्री कोण? याचे उत्तर अस्पष्ट आहे.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा राजीनामा अवघ्या 29 शब्दांत तयार करण्यात आला होता. हा राजीनामा मंत्री विजय चौधरी आणि विधान परिषद सदस्य संजय गांधी यांच्या माध्यमातून विधान परिषदेत सादर करण्यात आला. त्यांनी हा त्यागपत्र सभापती अवधेश नारायण सिंह यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी विजय चौधरी यांनी स्पष्ट केले की, नितीश कुमार हे राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून आल्यामुळे त्यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणे आवश्यक होते. ही केवळ घटनात्मक प्रक्रिया असून त्यात कोणताही राजकीय हेतू नसल्याचे त्यांनी सांगितले. सभापतींनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. दरम्यान, बिहारमधील राजकीय घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. नितीन नवीन यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी रविवारीच आपले त्यागपत्र पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांच्याकडे सुपूर्द केले होते. हा राजीनामा औपचारिकरीत्या सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली असली तरी, नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा कधी देणार, आणि पुढील मुख्यमंत्री कोण होणार, याचे उत्तर अनुत्तरितच आहे.

COMMENTS