Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोहरी तलाव दुरुस्तीसाठी ‘धरण सुरक्षा समिती’ येणार  

जामखेड : तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या मोहरी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या दुरुस्तीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आ. रोहित पवार यांच्या सातत्यपूर

कर्जत तालुक्यात कुकडीचे आवर्तन सुरू;पाण्यासाठीच वापर ; २५ ठिकाणी पाणी सोडले
एका महिन्यात नांदेड जिल्ह्यात 36 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश1098 हेल्पलाईनच्या मदतीने महिला व बाल विकास विभागाची धडक कारवाई
‘कळसुबाई’वर अत्याधुनिक सुविधेसह पर्यावरण संरक्षणाची मागणीवनमंत्री गणेश नाईक यांना निवेदन; पाहणीचे आदेश

जामखेड : तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या मोहरी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या दुरुस्तीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आ. रोहित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाला जाग आली असून, येत्या सोमवारी (दि. १३ एप्रिल) ‘धरण सुरक्षा आढावा समिती’ मोहरी धरणाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.मोहरी धरणाच्या भिंतीला पडलेले भगदाड आणि सांडव्याची झालेल्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे आमदार रोहित पवार यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत धुमाळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पत्राद्वारे तातडीच्या कार्यवाहीची मागणी केली. यानंतर जलसंपदा विभागाच्या कृष्णा खोरे प्रकल्पाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मोहरी तलावाची पहाणी करण्यासाठी उच्चस्तरीय तांत्रिक समिती येणार आहे. या समितीच्या अहवालानंतर तातडीने मजबुतीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

COMMENTS