ढवळपुरी येथे आरोपी थोरातचा पुतळा जाळला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ढवळपुरी येथे आरोपी थोरातचा पुतळा जाळला

भाळवणी : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आला. संतप्त ग्रामस

जुन्या बसस्थानकाच्या विकासातून रोजगारनिर्मितीची मागण; आ. गर्जे यांचे परिवहन मंत्री सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक; आ.विक्रमसिंह पाचपुते यांनी अधिवेशनात केला प्रश्न उपस्थित
कर्जत ‘राममय’; धार्मिक कार्यक्रमांनी शहर दुमदुमले

भाळवणी : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आला. संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत आरोपी यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ यांच्या पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध नोंदविला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी रविवारी पहाटे आरोपीला अटक केली असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेत अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ अत्याचार झाल्याचे समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठ्या संख्येने एकत्र आले. यावेळी आरोपीच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत त्याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. गावातील दुकाने व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवून ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला.

या आंदोलनाचे नेतृत्व सरपंच नंदाताई गावडे यांनी केले. त्यांनी सांगितले की, समाजात मार्गदर्शन करण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीकडून असे कृत्य होणे अत्यंत गंभीर असून, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. महिलांनीही संताप व्यक्त करत पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी केली.

COMMENTS