उपमुख्यमंत्र्यांनी आधीचा कार्यकाळ आठवुन आताच्या  कार्यकाळाशी तुलना करावी – संजय राऊत 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपमुख्यमंत्र्यांनी आधीचा कार्यकाळ आठवुन आताच्या  कार्यकाळाशी तुलना करावी – संजय राऊत 

मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत अराजकता आणि अनागोंदी सुरु आहे.  आमदार आणि लोकप्रतिनिधी सोडा पण सामान्य जनता, व्या

घारापुरी ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची शक्यता
तरूणांनी धार्मिक कर्मकांडातून बाहेर पडावे ः राजन खान
डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार ‘नाम’ची ऊर्जा वाढवणारा : नाना पाटेकर

मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत अराजकता आणि अनागोंदी सुरु आहे.  आमदार आणि लोकप्रतिनिधी सोडा पण सामान्य जनता, व्यापारी,  महिला वर्ग,एका भीतीच्या वातावरणाखाली आहेत.  आदित्य ठाकरेंसोबत जो प्रसंग घडलेला आहे पोलीस कितीही सारवासारव करू दे. पण हा विषय कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात आहे. मराठवाड्यामध्ये विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर देखील हल्ला झाला असे अनेक प्रकार रोज घडत आहेत. मंत्रिमंडळ काम करत नाही. उपमुख्यमंत्र्यांनी आपला आधीचा कार्यकाळ आठवावा आणि आताच्या  कार्यकाळाशी तुलना करावी.   लोकप्रतिनिधी सुद्धा दहशतीमध्ये आहे. विशेषतः विरोधक विरोधकांची सुरक्षा व्यवस्था ज्या पद्धतीने काढून घेतली आहे. नेमका राज्य सरकारचा डाव काय आहे ? मिंदे गटात जाणाऱ्या लोकांच्या मागे पोलिसांचा लवाजमा असतो.  गृहमंत्र्यांनी वेळीच पावल उचलली नाहीत तर त्याचा फटका त्यांना बसू शकतो

COMMENTS