Homeताज्या बातम्या

नांदेड शहरातील साई-गणेश देवस्थान, येथे २७ ते २९ जुलै दरम्यान गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन; विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

नांदेड: शहरातील मालेगाव रोडवरील स्वयंवर मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या श्री साई-गणेश देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुरुपौर्णिमा उत्सवाचे

’शहराचा तिसरा डोळा’ मिटला; बंद सीसीटीव्हींमुळे सुरक्षेची हमीच संशयाच्या भोवर्‍यात
तीन बिबट्यांची निघोज परिसरात दहशत; वनविभागाने त्वरित पिंजरे लावण्याची ग्रामस्थांची मागणी
राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ; नाशिकमध्ये गोदावरीला पूर, पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा

नांदेड: शहरातील मालेगाव रोडवरील स्वयंवर मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या श्री साई-गणेश देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुरुपौर्णिमा उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. दि. २७ जुलै ते २९ जुलै २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची विशेष रेलचेल असणार असल्याची माहिती देवस्थान व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

उत्सवाच्या निमित्ताने २७ आणि २८ जुलै रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत पुण्याच्या प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सौ. नम्रताताई व्यास यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांना संवादिनीवर मंगेश जवळेकर (परभणी) आणि तबल्यावर प्रशांत गाजरे (नांदेड) हे साथसंगत करणार आहेत.

उत्सवाच्या मुख्य दिवशी, म्हणजेच २९ जुलै रोजी सकाळी ७.०० ते ९.०० या वेळेत भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा कौठा येथील साईबाबा मंदिरापासून निघून श्री साई-गणेश देवस्थान, सरपंच नगर, नांदेड येथे पोहोचेल. कौठा येथे जाण्यासाठी भाविकांसाठी मंदिराकडून सकाळी ६ वाजता गाड्यांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

त्यानंतर सकाळी ९ ते १० या वेळेत डॉ. गजानन कोटगिरे आणि डॉ. सुनील कुलकर्णी यांच्या हस्ते ’श्री’चा महाअभिषेक संपन्न होईल. २९ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजल्यानंतर शिवराज पांडागळे यांच्या वतीने आरती व महाप्रसादाचे वाटप केले जाईल. या संपूर्ण तीन दिवसीय गुरुपौर्णिमा महोत्सवाचा व धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री साई-गणेश देवस्थानच्या वतीने अमर, राजेश व योगेश महाराज नेरलकर यांनी केले आहे.

COMMENTS