Sangamner : भाजप नेत्याच्या गाड्या रात्रीतून दिल्या पेटवून

Homeशहरंअहमदनगर

Sangamner : भाजप नेत्याच्या गाड्या रात्रीतून दिल्या पेटवून

भाजपाचे नेते संपत गलांडे यांच्या गाड्या अज्ञातांनी जाळल्या संगमनेर शहरात घटनेमुळे उडाली खळबळ  अज्ञात इसमाच्या विरुद्ध गुन्हा दाखल 

महायुतीच्या घटकपक्षांना न्याय देणे हि माझी नैतिक जबाबदारी : आमदार काशिनाथ दाते
कंत्राटी कर्मचारी एक हजाराची लाच घेतांना पकडला
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या श्रीरामपूर विधानसभा समितीत खंडागळे यांची सदस्यपदी नियुक्ती

भाजपाचे नेते संपत गलांडे यांच्या गाड्या अज्ञातांनी जाळल्या

संगमनेर शहरात घटनेमुळे उडाली खळबळ

 अज्ञात इसमाच्या विरुद्ध गुन्हा दाखल 

संगमनेर भारतीय जनता पक्ष ओबीसी सेलचे अध्यक्ष संपत रामचंद्र गलांडे यांच्याकडे असलेल्या चारचाकी व दोन दुचाकी गाड्या कोणीतरी अज्ञाताने जाळून टाकल्याची घटना आज घडली  .या घटनेमुळे संगमनेर शहरात मोठी खळबळ उडाली आहे..

याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संपत गलांडे आपल्या कुटुंबासोबत शहरातील अभंग मळा या ठिकाणी राहत आहे. नेहमीप्रमाणे त्यांची दहा लाख रुपयांची चार चाकी गाडी तसेच 50 हजार रुपयांची दुचाकी व 60 हजार रुपयांची दुसरी दुचाकी आपल्या घराच्या परिसरात लावली होती . रात्री ते व त्यांचे कुटुंब झोपी गेले असता रविवारी मध्यरात्री साडेचार वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या तीनही गाड्या जाळून टाकल्या . संपत गलांडे यांना जाग आल्याने त्यांनी समोर पाहताच गाड्या जळून खाक झाल्या असल्याचे त्यांना दिसले .त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना सांगितले असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . या प्रकरनी गलांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष एडवोकेट श्रीराम गणपुले यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत पोलिसांवर आरोप केले आहेत . तसेच संगमनेर शहरात गुन्हेगारांवर कोणत्याही प्रकारचा वचक राहिला असल्याचेही ते म्हणाले.

COMMENTS