केज : महाराष्ट्र दिनाचे औचित्य आणि युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त केज शहरात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भव्य व्हॉली

केज : महाराष्ट्र दिनाचे औचित्य आणि युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त केज शहरात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचा समारोप अत्यंत दिमाखदार वातावरणात पार पडला. दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत राज्याच्या विविध भागांतून आलेल्या नामांकित संघांनी सहभाग घेतला होता. खेळाडूंच्या दमदार फटकेबाजी, चुरशीचे सामने आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते.
स्पर्धेतील अंतिम सामना अत्यंत रंगतदार झाला. ‘पुणे जीएसटी’ आणि ‘अमन’ (बीड) या संघांमध्ये झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी जोरदार लढत दिली. पहिल्या सेटपासूनच आक्रमक खेळ, अचूक सर्व्हिस आणि भेदक स्मॅशमुळे सामना चुरशीचा झाला. मात्र निर्णायक क्षणी ‘पुणे जीएसटी’ संघाने संयम राखत आणि उत्कृष्ट टीमवर्क दाखवत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली व विजेतेपद आपल्या नावावर केले. स्पर्धेतील विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. अंतिम निकाल पुढीलप्रमाणे: प्रथम पारितोषिक (विजेता): पुणे जीएसटी टीम, द्वितीय पारितोषिक: अमन संघ, बीड, तृतीय पारितोषिक: अमन‘बी’संघ, बीड, चतुर्थ पारितोषिक: किनवट संघ (नांदेड) या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी आपल्या वैयक्तिक कौशल्याने प्रेक्षकांची दाद मिळवली. उत्कृष्ट कामगिरी करणार्या खेळाडूंना विशेष पुरस्कार देण्यात आले: मॅन ऑफ द मॅच: हर्ष चौधरी (निर्णायक सामन्यातील दमदार खेळासाठी), बेस्ट स्मॅशर: वाजिद सय्यद (आक्रमक व अचूक स्मॅशसाठी), बेस्ट सर्व्हिस: शोएब सय्यद (अचूक व प्रभावी सर्व्हिससाठी), बेस्ट लिब्रो: पांड्या (संरक्षणात उत्कृष्ट कामगिरी) बक्षीस वितरण सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. रंजीत पाटील, पीएसआय फारुख कादरी, कबीर इनामदार, अकबर इनामदार, पत्रकार प्रकाश मुंडे, विनोद गुंड सर, रमजान भाई, एत्तेशाम कादरी आणि वसीम शेख यांनी उपस्थित राहून विजेत्या खेळाडूंना सन्मानित केले. यावेळी मान्यवरांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिशान कादरी आणि खद्दीर कुरेशी यांनी विशेष परिश्रम घेतले. मैदानाची व्यवस्था, खेळाचे नियोजन, पंचांची व्यवस्था आणि प्रेक्षकांसाठी केलेल्या सोयी-सुविधांमुळे स्पर्धा शिस्तबद्ध व यशस्वी ठरली. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व खेळाडू, पंच, प्रायोजक आणि क्रीडाप्रेमी नागरिकांचे आभार मानले. या भव्य स्पर्धेमुळे केज तालुक्यात क्रीडेला चालना मिळाली असून युवकांमध्ये खेळाविषयी नवचैतन्य निर्माण झाले आहे. आयोजक मंडळाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

COMMENTS