Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेपरफूट प्रकरणात चार डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात

लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने शुक्रवारी लातूर शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरेनंतर आणखी तीन डॉक्टरांची चौकशी केली आहे. त्यामध्ये दोन

नगरपरिषदेचा ’काविळ’ की दुटप्पी न्याय?;अतिक्रमणांना अभय, मालकी हक्काच्या जागेला मात्र ’नोटीस’चा फास!
निदा खान प्रकरणात नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर महापालिकेची नोटीस; ‘मिसिंग’ मुलींच्या प्रकरणावरून आरोप
ठाणे महापालिकेचे उपायुक्त निलंबित
NEET paper leak लातुरातील तीन डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात! | Saamana (सामना)

लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने शुक्रवारी लातूर शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरेनंतर आणखी तीन डॉक्टरांची चौकशी केली आहे. त्यामध्ये दोन आयुर्वेदिक तज्ज्ञ, तर एक बालरोग तज्ज्ञ आहे. या सर्वांचे प्रा. पी. व्ही. कुलकर्णी कनेक्शन असल्याचा संशय सीबीआयला आहे.
  गेल्या सात दिवसांपासून लातुरात आलेल्या सीबीआय पथकाने शिवराज मोटेगावकर, प्रा. पी. व्ही. कुलकर्णीच्या अटकेनंतर डॉ. मनोज शिरूरेंची तसेच त्यांच्या नातेवाईक असलेल्या बीएएमएस डॉक्टराची चौकशी केली. दरम्यान, शुक्रवारी पथक औसा रोडवरील एक आयुर्वेद तज्ज्ञ तसेच बार्शी रोडवरील एका बालरोग तज्ज्ञांकडे धडकले असून, दोघांचीही हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी झाली.
   लातूर ग्रामीणमधील खोपेगाव ग्रामपंचायत हद्दीतील गट क्र. ११४ मधील बांधकामासंदर्भात शिवराज मोटेगावकरला जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी २१ मे रोजी नोटीस बजावली आहे. बांधकाम परवानगीच्या नकाशातील बांधकाम क्षेत्र वा अंतिम अभिन्यास मंजुरीकरिता सादर केलेला अंतिम सीमांकनाच्या मोजणी नकाशावरील नमूद बांधकाम क्षेत्र यामध्ये मोठी तफावत आहे.
त्यामुळे अनधिकृत बांधकाम तडजोड शुल्काची रक्कम विकासकाने शासनजमा केल्यास पुढील कार्यवाही नियमाने होईल, असे नोटिशीत म्हटले आहे तसेच नगररचना विभागानेही बीपीएमएस प्रणालीद्वारे बांधकाम नकाशे सादर करण्याबाबत यापूर्वीच कळविले होते परंतु, सुधारित नकाशे देण्यात आले नाहीत.
नगररचना विभागाकडून जोपर्यंत अंतिम अहवाल व तडजोड शुल्काची रक्कम निश्चित केली जात नाही, तोपर्यंत पुढील कारवाई होणार नाही. एक महिन्याच्या आत सुधारित बांधकाम नकाशे नगररचना विभागाकडे सादर करावेत, अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे.

COMMENTS