Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बागेश्‍वर बाबांच्या विधानाविरोधात नांदेडमध्ये काँग्रेस आक्रमक

नांदेड : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बागेश्‍वर बाबा यांनी केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमव

कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर हायव्होल्टेज ड्रामा प्रवेश नाकारल्याने शिवसेना कार्यकर्त्यांचे आंदोलन
गायकवाड यांची भंपकगिरी इतिसाच्या अज्ञानातून !
संगमनेरात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन

नांदेड : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बागेश्‍वर बाबा यांनी केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. महापुरुषांविषयी होत असलेल्या अवमानकारक वक्तव्यांमुळे संताप व्यक्त करत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले.
काँग्रेसच्या वतीने आयोजित निषेध आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी घोषणाबाजी करत संबंधित वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कोणत्याही व्यक्तीने बेजबाबदार वक्तव्य करणे सहन केले जाणार नाही. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनीही या प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांविषयी बोलताना जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक असून, समाजात तेढ निर्माण करणारी विधाने टाळली पाहिजेत, असे त्यांनी म्हटले.
काँग्रेस पदाधिकार्‍यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात महापुरुषांचा वारंवार होणारा अपमान थांबवण्यासाठी कठोर भूमिका घेण्याची मागणी केली. काही मंडळींकडून प्रथम आक्षेपार्ह वक्तव्य करायचे आणि नंतर माफी मागायची, अशी चुकीची पद्धत रूढ होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. बागेश्‍वर बाबांनी नंतर माफी मागितली असली, तरी वक्तव्य करण्यापूर्वी विचार करणे आवश्यक होते, अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. भविष्यात राज्यातील कोणत्याही महापुरुषांविषयी अवमानकारक भाषा वापरली जाणार नाही, यासाठी शासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.या आंदोलनामुळे शहरात काही काळ राजकीय वातावरण तापले होते. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे महापुरुषांच्या सन्मानाच्या प्रश्‍नावर पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले.

COMMENTS