Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ.क्षीरसागर यांच्याकडून विकास कामाचा शुभारंभ

बीड प्रतिनिधी - राज्यासह जिल्ह्यात सत्तानाट्य सुरू असताना आ.संदीप क्षीरसागर मात्र न डगमगता मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी नियमितपणे का

मुक्रमाबाद परिसरात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस
अहमदनगर मध्ये एसटी चालकाची गळफास घेऊनआत्महत्या (Video)
स्वराज्य पक्षाच्या पहिल्या वर्धापन दिनी हजारो सैनिक मुंबईत होणार दाखल – करण गायकर  

बीड प्रतिनिधी – राज्यासह जिल्ह्यात सत्तानाट्य सुरू असताना आ.संदीप क्षीरसागर मात्र न डगमगता मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी नियमितपणे कामांचा शुभारंभ आणि आढावा घेताना दिसत आहेत. शहरासह मतदारसंघाचा विकास झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असे त्यांनी याअगोदरच सांगितले आहे. यावर झोकून ते काम करत असल्याचे स्पष्ट होते आहे.
आ.संदीप क्षीरसागर यांनी गुरुवार (दि.13) रोजी शहरातील प्रभाग क्रं.8 मधील सुरू असलेल्या अक्षय कॉलनी रस्ता व नाली बांधकाम, प्रभाग क्रं.18 मधील रस्ता व नाली बांधकाम, शहरातून जाणार्‍या बिंदुसरा नदीवरील संरक्षण भिंत बांधकाम, बोबडेश्वर गल्लीतील रस्ता व नाली बांधकाम, धोंडीपुरा भागातील रस्ता व नाली बांधकाम, कोतवाल गल्लीतील रस्ता व नाली बांधकाम करणे. या कामांची पाहणी करून आढावा घेतला व या कामांच्या दर्जाबाबत संबंधितांना निर्देश दिले. तसेच अंबिका चौक  परिसरात वारंवार पाण्याच्या वाल गळती होत असल्याने अधिकार्‍यांना याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. आ.संदीप क्षीरसागर यांनी शुक्रवार (दि.14) रोजी पुन्हा शहरात दौरा करत कै.शिवाजीराव धांडे नगर मधील दोन कॉलनी मधील रस्त्यांच्या कामाचा नारळ फोडून शुभारंभ केला. यावेळी या भागातील नागरिकांच्या आग्रहास्तव त्यांच्या कॉलनीत  जाऊन, त्यांच्याशी संवाद साधून रस्ता व इतर अडचणी प्रत्यक्ष समजून घेतल्या. यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांच्यासोबत माजी आ.सय्यद सलीम, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

COMMENTS