Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘जुनी पेन्शन’ रद्द केल्याच्या निषेधार्थ शिक्षकांचे आंदोलन 

लोकमंथन प्रतिनिधी -  शासनाने ३१ ऑक्टोबर २००५ रोजी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा निषेध म्

महाबळेश्‍वर-पाचगणीच्या पर्यटन मास्टर प्लॅनला मंजूरी द्या : खा. श्रीनिवास पाटील यांची लोकसभेत जोरदार मागणी
संकट काळात प्रामाणिक सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांची देशाला गरज – पद्मश्री पोपटराव पवार.
वांबोरीतील जनता दरबारात दिव्यांग महिलेला ना.तनपुरे यांनी दिले स्वतः रेशनकार्ड

लोकमंथन प्रतिनिधी –  शासनाने ३१ ऑक्टोबर २००५ रोजी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा निषेध म्हणून नाशिक जिल्हा जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वाखाली प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या शिक्षकांनी मंगळवारी (दि. ३१) काळ्या फिती लावून शालेय कामकाज केले. आंदोलक शिक्षकांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली. देशात राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक, हिमाचल, पश्चिम बंगाल, , तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये जुनी पेन्शन असून, महाराष्ट्रासह ने गुजरात, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये राष्ट्रीय निवृत्तिवेतन 

प्रणाली (एनपीएस) लागू केली आहे. एनपीएस योजना शासन व कर्मचाऱ्यांची फसवणूक करणारी आहे. कर्मचाऱ्यांचे पैसे शेअर्स मार्केटमध्ये गुंतून त्यामधून कोणत्याही परताव्याची हमी नसतानाही ही योजना लागू केली. कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा मासिक पगारातील दहा टक्के हप्ता हा कपात होऊन शेअर्स मार्केटमध्ये जमा होतो. त्याचा कोणता हिशेब आतापर्यंत शासनाने कर्मचाऱ्यांना न दिल्याने एनपीएसला शिक्षकांचा विरोध आहे. आंदोलकांनी ‘एक मिशन-जुनी पेन्शन’ घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. यावेळी वैभव गगे, विजय बडे, सचिन देशमुख, सुमित बच्छाव, मनीषा गवळी, कविता महाले, हरीष तुंगार आदी उपस्थित होते.

COMMENTS