Homeताज्या बातम्या

बीड जिल्ह्याची मान उंचावली; तवलवाडीच्या प्रशांत जगतापची मुंबईत ‘फॉरेन्सिक सायन्स’ अभ्यासक्रमासाठी निवड

आष्टी : आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथील प्रशांत रवींद्र जगताप याची मुंबईतील 'होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी' अंतर्गत चालणाऱ्या प्रतिष्ठित फॉरेन्सि

पॉलिसीतून साकारले स्वप्नवत लग्न; वधू-वरांसाठी विम्याची अनोखी भेट!गायत्री-आकाश विवाह सोहळा ठरला आर्थिक नियोजनाचा आदर्श; विमा प्रतिनिधी रमेश भोगाडे यांच्या कार्याची दखल
कासारी येथे कृषी कन्यांचे आगमन; ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमाला सुरुवात
बाळेवाडी गावामध्ये कृषीदूतांचे उत्साहात स्वागत; आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार हेच उद्दिष्ट
Dr. HOMI BHABHA STATE UNIVERSITY, MUMBAI (HBSU), The Government of  Maharashtra has established the Dr. Homi Bhabha State University, as a  Cluster University in 2019, with the Institute of Science, ...

आष्टी : आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथील प्रशांत रवींद्र जगताप याची मुंबईतील ‘होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी’ अंतर्गत चालणाऱ्या प्रतिष्ठित फॉरेन्सिक सायन्स (गुन्हे अन्वेषण विज्ञान) पदवी अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. राज्यभरातून अत्यंत मर्यादित म्हणजेच केवळ ६० विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणाऱ्या या अत्यंत कठीण अभ्यासक्रमात स्थान मिळवणारा प्रशांत हा बीड जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी ठरला आहे.

बारावीनंतर प्रवेश मिळणारा हा तीन वर्षांचा विशेष पदवी अभ्यासक्रम महाराष्ट्रातील मोजक्या तीन शासकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहे. कठीण स्पर्धा आणि मर्यादित जागा असतानाही प्रशांतने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर हे उल्लेखनीय यश संपादन केले. फॉरेन्सिक सायन्स हे गुन्हे अन्वेषण क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे आधुनिक विज्ञान मानले जाते. खून, अपघात, सायबर गुन्हे, डीएनए तपासणी आणि डिजिटल पुराव्यांचे परीक्षण अशा अनेक तपास प्रक्रियांमध्ये या शाखेतील तज्ज्ञांची भूमिका अत्यंत निर्णायक असते. या क्षेत्रातून सीबीआय (CBI), सीआयडी (CID) यांसारख्या केंद्रीय व राज्य तपास यंत्रणांमध्ये करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात.

प्रशांतने आपले प्राथमिक शिक्षण तवलवाडी येथील पंडित नेहरू विद्यालयात पूर्ण केले, तर अकरावी व बारावीचे शिक्षण जामगाव येथील निवृत्तीराव उच्च माध्यमिक विद्यालयात घेतले. त्याच्या या यशाबद्दल आष्टी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. प्रशांतच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

COMMENTS