Homeताज्या बातम्यादेश

सुप्रसिद्ध गायक राजू पंजाबीचं निधन, ४० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हरियाणा- सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींनी अखेरचा श्

दाऊदचा पुतण्या सोहेल कासकरला भारतात आणण्याचे प्रयत्न अयशस्वी| LOKNews24
शिवसेना महिला नेत्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला 
‘नोरा फतेही’चा अश्रूंचा बांध फुटला, म्हणाली पछताओगे…

हरियाणा- सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींनी अखेरचा श्वास घेतला. आता देखील एका प्रसिद्ध गायकाचं निधन झलं आहे. वयाच्या ४० व्या वर्षी गायकाने अखेरचा श्वास घेतला. गायकाच्या निधनामुळे चाहत्यांना आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. हरियाणा येथील प्रसिद्ध गायक राजू पंजाबी याचं निधन झालं आहे. मंगळवारी गायकाने अखेरचा श्वास घेतला. एका रुग्णालयात गायकावर उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान राजू पंजाबी याचं निधन झालं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. प्रकृती खालवल्यामुळे राजू पंजाबी याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण मंगळवारी पहाटे चार वाजता गायकाने अखेरचा श्वास घेतला. ‘देसी-देसी ना बोल्याकर’ गाण्यामुळे गायकाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. राजू पंजबी उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध गायक होता. पण आता गायकाने जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. राजू पंजाबी ४० वर्षांचा होते. गेल्या अनेक दिवसांपासून गायकाची प्रकृती खालावली होती. राजूला काविळीचा त्रास होता, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्याला घरी देखील पाठवण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर अचानक प्रकृती बिघडल्याने गायकाला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हरियाणातील पंजाबी गायकाच्या आकस्मिक निधनाने कुटुंबिय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. राजू यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. राजूच्या मृत्यूची बातमी मिळताच त्यांचे नातेवाईक आणि चाहते गायकाच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले आहेत. आज राजू पंजाबी याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

COMMENTS