Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘बिग बॉस मराठी ६’ वर तन्वी कोलतेचं नाव! १०० दिवसांच्या थरारानंतर तन्वी ठरली ‘महाविजेती’; पाहा काय काय मिळालं बक्षीस?

मुंबई : शंभर दिवसांचा प्रवास… शंभर कॅमेऱ्यांची नजर… आणि अखेर ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता, तो क्षण आला! 'बिग बॉस मराठी सिझन ६' ला आपली

कॅनडात कपिल शर्माच्या कॅफेजवळ पुन्हा गोळीबार; वर्षभरातील चौथी घटना, बिश्नोई गँगचा संबंध असल्याचा संशय!
‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर कडकडाट! ३ दिवसांत ३७ कोटींची कमाई; चित्रपट करमुक्त करण्यासाठी अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र!
राजा शिवाजी चित्रपट करमुक्त करा : आ. दानवेंची मागणी
Bigg Boss Marathi Season 6 Winner Tanvi Kolte : तन्वी कोलते जिंकली!  उपविजेता ठरला 'हा' सदस्य, जिंकले तब्बल 'इतके' लाख

मुंबई : शंभर दिवसांचा प्रवास… शंभर कॅमेऱ्यांची नजर… आणि अखेर ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता, तो क्षण आला! ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ ला आपली महाविजेती मिळाली आहे. अटीतटीच्या सामन्यात बाजी मारत तन्वी कोलतेने मानाची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.
मुंबईत पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात तन्वीला विजेतेपदाने गौरवण्यात आलं. तिला कलर्स मराठीकडून १५ लाख रुपये, पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे १० लाखांचं वाऊचर आणि रेवा डायमंडची ज्वेलरी मिळाली. इतकंच नाही तर, तुनवाल ई-मोटर्सची ‘ई-बाइक’ आणि रितेश देशमुख यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांची सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
विजेतेपद मिळाल्यानंतर तन्वी भावूक झाली. ती म्हणाली, “मी घरात आले तेव्हा विचारलं जायचं काय काम केलंय? पण मी ठरवलं होतं, बाहेर पडताना माझं नाव सगळ्यांच्या तोंडी असेल. आज मी फक्त तन्वी कोलते म्हणून नाही, तर एक ‘ब्रॅण्ड’ बनून बाहेर पडत आहे!”
१७ सदस्य आणि १०० दिवसांचा हा प्रवास वादावाद, मैत्री आणि नात्यांच्या रंगांनी भरलेला होता. पण प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवत तन्वीने हा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला.
तन्वीच्या या विजयाने तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तुम्हाला तन्वीचा खेळ कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की कळवा.

COMMENTS