Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरीतील 45 पोलिस पाटील पदाची होणार भरती

राहुरी/प्रतिनिधी ः नगर जिल्ह्यात गेल्या एक तपापासून रखडलेल्या पोलिस पाटील भरतीसाठी शासनाकडून हिरवा कंदील नुकताच दाखवण्यात आला आहे. 15 मे पासून ही

Sangmaner : भाजपा युवा मोर्चाचे संगमनेर नगरपरिषदेमध्ये ठिय्या आंदोलन | LOKNews24
ओव्हरलोड वाहनावर कडक कारवाई करणार्‍या महिला उप प्रादेशिक अधिकार्‍यास दमदाटी
दुचाकीस्वाराला जखमी करून पळून जाणाऱ्या पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

राहुरी/प्रतिनिधी ः नगर जिल्ह्यात गेल्या एक तपापासून रखडलेल्या पोलिस पाटील भरतीसाठी शासनाकडून हिरवा कंदील नुकताच दाखवण्यात आला आहे. 15 मे पासून ही पोलीस पाटील भरती प्रक्रिया जाहीरनामा प्रसिद्ध होऊन सुरू होणार आहे. प्राप्त वृत्तानुसार राहुरी तालुक्यातील तब्बल 45 पदे ही रिक्त असून 16 मे पासून अर्ज भरायला प्रारंभ होईल. 15 जून रोजी लेखी परीक्षा, 27 जून रोजी तोंडी परीक्षा तर 30 जून रोजी पात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.
जिल्हा प्रशासनाकडून हा कार्यक्रम प्रसिद्ध होणार असून पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी ही संबंधित उपविभागीय कार्यलयांच्या फलकावर प्रसिद्ध होणार आहे. मात्र ज्या गावांमध्ये पोलीस पाटील भरती प्रक्रिया होणार आहे, तेथील आरक्षणाबाबत मात्र ग्रामस्थ अनभिज्ञ असल्याची माहिती समजली आहे. अगोदर आरक्षण निश्‍चित करावे व पोलीस पाटील भरती करावी, अशी मागणी यापूर्वी झालेली आहे. त्यामुळे आता होणार्‍या पोलीस पाटील भरती मध्ये आरक्षण केले जाणार आहे का ? हा प्रश्‍न लाभार्थी गावांमधून विचारला जात आहे. त्यामुळे राहुरी येथील कोणत्या गावातील पदे रिक्त आहेत व आरक्षण आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे अशी असेल प्रक्रिया 15 मे जाहीरनामा प्रसिद्ध, 16 मे ते 26 मे अर्ज भरणे, 29 मे ते 30 मे अर्जांची छाननी, 5 जून पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध,15 जून लेखी परीक्षा, 20 जून उत्तीर्ण उमेदवारांची यादी, 22 जून मूळ कागदपत्रांची यादी, 27 जून तोंडी परीक्षा, 30 जून पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध.

COMMENTS