हिम्मत असेल तर विरोधकांनी साखर कारखाने चालवून दाखवावेत… अजित पवारांचे खुले आव्हान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिम्मत असेल तर विरोधकांनी साखर कारखाने चालवून दाखवावेत… अजित पवारांचे खुले आव्हान

प्रतिनिधी : पुणे एकीकडे राज्यातील साखर कारखाण्याची दयनीय अवस्था झाली आहे . मात्र दुसरीकडे विरोधकांकडून आम्ही खाजगी कारखान्याचे समर्थक, पाठीराखे आह

अपात्र ठरविलेल्या शाळा, तुकड्यांना अनुदानास पात्र घोषित करुन वेतन अनुदान वितरित करावे
महागाईचा आलेख उंचावलेलाच
शासकिय योजनांची माहीती जनसामान्यपर्यंत पोहचवा सचिव भाऊ चौधरी

प्रतिनिधी : पुणे

एकीकडे राज्यातील साखर कारखाण्याची दयनीय अवस्था झाली आहे . मात्र दुसरीकडे विरोधकांकडून आम्ही खाजगी कारखान्याचे समर्थक, पाठीराखे आहोत , अशा वलगणा करण्यात येतात. 

असे असेल तर विरोधकांनी साखर कारखाने चालून दाखवावेत त्यांना माझं खुलं आव्हान आहे , असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत . ते बारामतीत सोमेश्वर साखर कारखाना निवडणूकीच्या आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते.

काही दिवसांपूर्वी पारनेरच्या कारखान्या संदर्भात माझ्यावर आणि पवार साहेबांवर चुकीचे आरोप लावले जातात यात काही तथ्य नाही . 

माझी खासदार नानासाहेब नवले यांनी स्वतःची प्रॉपर्टी विकून तो कारखाना स्वतःसाठी खरेदी केलेला आहे. भाजपच्या काळात तो कारखाना त्यांच्याच प्रशासनाने विक्रीसाठी काढलेला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली .

मागील काही दिवसांपासून साखरच विकली जात नव्हती. त्यामुळे पोती गोडाऊन मध्ये पडून होती . याचा आर्थिक फटका अनेक साखर कारखान्यांना बसला. मात्र ब्राझीलमध्ये दुष्काळ पडल्याने साखरेला आता चांगला भाव आला आहे. 

आता साखर विक्रीतून आपल्याला फायदा मिळेल. हे लक्षात घेता सभासदांनी आपल्या विचाराचे संचालक बोर्ड निवडून द्यावे असे आवाहन पवारांनी केले आहे .

सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी झाली पाहिजे आता विरोधकातील काही हौसे, गवसे, नवसे यांनी पॅनल उभा केला आहे. 

मात्र त्यांनी पुणे मार्केट कमिटीत झालेला सावळा गोंधळ चव्हाट्यावर आणल्यास कठीण जाईल , असा इशाराही पवारांनी भाजपचे विरोधी पॅनलचे प्रमुख आणि माझी पुणे मार्केटचे सभापती दिलीप खैरे यांना दिला.

COMMENTS