Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजा शिवाजी चित्रपट करमुक्त करा : आ. दानवेंची मागणी

मुंबई : शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी अभिनेते रितेश देशमुख यांच्या राजा शिवाजी या चित्रपटाला राज्यात करमुक्त दर्जा देण्याची मागणी केली आहे. या

समृद्धी महामार्गावर अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यात झालेली गळाभेट..
घरी बोलावून मंत्री केलं ही माझी चूक; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आ. बच्चू कडूंवर टीकास्त्र
अंबादास दानवेंना विधानपरिषदेची उमेदवारी; ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी; काँगे्रस देणार उमेदवार
राजा शिवाजी चित्रपट करमुक्त करा, अंबादास दानवे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  | Saamana (सामना)

मुंबई : शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी अभिनेते रितेश देशमुख यांच्या राजा शिवाजी या चित्रपटाला राज्यात करमुक्त दर्जा देण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.
दानवे यांनी आपल्या पत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचे गौरवपूर्ण वर्णन करत, त्यांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याचा उल्लेख केला आहे. शिवरायांनी उभारलेले हिंदवी स्वराज्य हे न्याय, समानता, स्त्रीसुरक्षा, शेतकरी संरक्षण आणि सर्वधर्म समभाव या तत्त्वांवर आधारित आदर्श शासनव्यवस्था असल्याचे त्यांनी नमूद केले. राजा शिवाजी या चित्रपटातून शिवरायांच्या कार्याची प्रभावी मांडणी करण्यात आली असून, त्यांच्या शौर्याबरोबरच लोककल्याणकारी दृष्टी, प्रशासनातील कौशल्य आणि गनिमी काव्याची रणनिती नव्या पिढीपर्यंत पोहोचणार असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रासाठी दिलेले त्यांचे योगदान या माध्यमातून अधिक ठळकपणे समोर येईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. विशेषतः युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी हा चित्रपट उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे या चित्रपटाला करमुक्त दर्जा देऊन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

COMMENTS