दिवाळीच्या औचित्याने घराघरात पोहोचण्यासाठी भावी नगरसेवकांचा खटाटोप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिवाळीच्या औचित्याने घराघरात पोहोचण्यासाठी भावी नगरसेवकांचा खटाटोप

कर्जत : किरण जगताप नगरसेवकांची मुदत संपल्याने कर्जत नगरपंचायतीत एक वर्षापासून प्रशासक राज आहे. आता कधीही निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. त्या पा

शिवसेनेला मोठा धक्का ! नवी मुंबईतील 32 माजी नगरसेवक शिंदे गटात.
ऐन पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी वणवण… महापौरांच्या प्रभागात पाण्याचे संकट
प्रभागातील विकास कामांचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडणे नगरसेवकांचे आद्य कर्तव्य – आ.संग्राम जगताप

कर्जत : किरण जगताप

नगरसेवकांची मुदत संपल्याने कर्जत नगरपंचायतीत एक वर्षापासून प्रशासक राज आहे. आता कधीही निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर दिवाळीचे औचित्य साधून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा खटाटोप भावी नगरसेवकांकडून केला जात आहे.

 गेल्या वर्षी दिवाळीच्या कालावधीत कोरोनाची तीव्रता अधिक होती. त्याही परिस्थितीत किराणा माल, मास्क, सॅनिटायझर, दिवाळी फराळ व इतर भेटवस्तू देवून मतदारांपर्यंत पोहोण्याचा प्रयत्न झाला. विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. मात्र निवडणुका लांबल्याने उमेदवारांचे नियोजन कोलमडून गेले.

सध्या कोरोनाचे सावट कमी झालेले आहे. लवकरच निवडणुका जाहीर होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे दिवाळीच्या औचित्याने वार्डातील घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न कर्जतमधील भावी नगरसेवकांकडून केला जात आहे.

 सध्या तरी कर्जतमध्ये राजकीय चित्र स्पष्ट होत नसल्याने इच्छुकांमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या काही इच्छुकांची जोरदार तयारी सुरू आहे. आपला फोटो छापून शुभेच्छापत्रे, भेटवस्तू, मिठाई पाकीट वाटपाचे नियोजन त्यांच्याकडून केल्याचे दिसत आहे. सोशल मीडियातून दिवाळी शुभेच्छांचा मारा सुरुच आहे.

वार्डातील लोकांकडून मात्र जो इच्छुक येईल त्याचे स्वागत केले जात आहे. कृतिशीलता दाखवण्यासाठी वार्डनिहाय विविध उपक्रम घेतले जात आहेत. महिला, बालके, युवक तसेच वृद्धांकडून त्यात सहभाग घेतला जात आहे. नेत्यांकडून आपापल्या पद्धतीने झालेला आणि होणारा विकास पटवून दिला जात आहे.

इच्छुकांकडून आपली प्रतिमा जनतेत बिंबवण्याचा प्रयत्न विविध माध्यमातून केला जात आहे. लोकांच्या गाठीभेटी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. अडीअडचणी समजून घेतल्या जात आहेत. अनेकांनी सोशल मीडियात वार्डनिहाय ग्रुप तयार केलेले आहेत. त्या माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी आपण कसे तत्पर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

मात्र शहरातील मतदार हे सुशिक्षित असल्याने त्यांच्याकडून इच्छुकांचा सर्वांगीण अभ्यास केला जात आहे. मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली असल्याने भूलथापांना बळी पडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होणार नाहीत असे दिसते. सर्वांनाच लांबलेल्या निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. त्यामुळे पुढील काळ हा राजकीय हालचाली गतिमान करणारा असणार आहे.

COMMENTS