पोलीस भरतीचा सराव करताना २३ वर्षीय युवकाचा मैदानावरच मृत्यू.

Homeताज्या बातम्या

पोलीस भरतीचा सराव करताना २३ वर्षीय युवकाचा मैदानावरच मृत्यू.

संघपाल नरवाडे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव.

हिंगोली  प्रतिनिधी- हिंगोली(Hingoli) शहरात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २३ वर्षीय युवकाचा मैदानावरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संघपाल न

थट्टा मस्करी केल्याच्या रागातून मित्रानेच केला मित्राचा खून
जेव्हा पासुन देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तेव्हा पासुन आता पर्यंत बेरोजगारीचे प्रमाण अधिक वाढलं – भाई जगताप 
जयंत कबड्डी प्रिमियर लीग’चे 20 फेब्रुवारी ला शुभारंभ; राष्ट्रीय कबड्डीपटू खंडेराव जाधव यांची माहिती

हिंगोली  प्रतिनिधी- हिंगोली(Hingoli) शहरात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २३ वर्षीय युवकाचा मैदानावरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संघपाल नरवाडे(Sanghpal Narwade) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो वसमत(Wasmat) शहरातील रहिवासी होता. संघपाल गेल्या काही दिवसापासून दररोज हिंगोली शहरातील आदर्श महाविद्यालयाच्या मैदानावर आपल्या सहकारी मित्रांसोबत पोलीस भरतीची तयारी करत होता. मात्र, मैदानावर धावत असताना संघपाल अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी तातडीने त्याला शासकीय रुग्णालयात( government hospital) दाखल केले मात्र डॉक्टरांनी संघपाल ला मृत घोषित केले.

COMMENTS