Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागलवाडी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

कर्जत :  तालुक्यातील नागलवाडी येथील ग्रामपंचायतीअंतर्गत विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत ऍड. अविनाश अंकुश मते यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तक्रार अर्जानुसार, १४ व्या व १५ व्या वित्त आयोगातून वाडी वस्त्यांवर हातपंप बसविणे, पाईपलाईन टाकणे तसेच पाणीपुरवठा योजनेच्या विविध कामांसाठी लाखो रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असून काही ठिकाणी कामेच न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तरीदेखील कागदोपत्री मोठ्या प्रमाणात खर्च दाखविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. विशेषतः शेलके-कवळे वस्ती परिसरात पाईपलाईन व पाणी टाकी कामासाठी लाखो रुपयांचा खर्च दाखवण्यात आला असताना प्रत्यक्षात कामांची स्थिती समाधानकारक नसल्याचे सांगण्यात आले आहे. एकाच कामासाठी वेगवेगळ्या कालावधीत निधी दाखवून बिलांची पुनरावृत्ती केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, १४ व्या वित्त आयोगातून सुमारे ४,६३,४३२ रुपये, १५ व्या वित्त आयोगातून १,८८,८८८ रुपये तसेच इतर कामांसाठी मिळून एकूण सुमारे ७ लाख २७ हजार रुपयांचा निधी खर्च दाखवण्यात आला आहे. तसेच शेळके-कवळे वस्ती परिसरातील पाईपलाईन कामासाठी विविध कालावधीत सुमारे ४ लाखांहून अधिक खर्च दाखवून एकाच कामासाठी अनेक वेळा बिले काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागवूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सरपंच व ग्रामसेवकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, सात दिवसांत चौकशी करून कारवाई न झाल्यास ७ मे रोजी गटविकास अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा तक्रारदार ऍड. मते यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

जयहिंदच्या माध्यमातून विज्ञाननिष्ठ पिढी घडेल :माजी आमदार डॉ. सुधीर तांबे 
काँग्रेसचा ‘युवा संगम’ कार्यक्रम भविष्याची दिशा ठरवणारा : माजी मंत्री सतेज पाटील; संगमनेरमध्ये युवा संगम कार्यक्रमात संवाद
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत; धोत्रे ग्रामपंचायत प्रथम; १५ लाखांचे बक्षीस  
Karjat Nagarpanchayat in Karjat Ahmednagar,Ahmednagar - Best Government  Organisations near me in Ahmednagar - Justdial

कर्जत :  तालुक्यातील नागलवाडी येथील ग्रामपंचायतीअंतर्गत विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत ऍड. अविनाश अंकुश मते यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

तक्रार अर्जानुसार, १४ व्या व १५ व्या वित्त आयोगातून वाडी वस्त्यांवर हातपंप बसविणे, पाईपलाईन टाकणे तसेच पाणीपुरवठा योजनेच्या विविध कामांसाठी लाखो रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असून काही ठिकाणी कामेच न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तरीदेखील कागदोपत्री मोठ्या प्रमाणात खर्च दाखविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

विशेषतः शेलके-कवळे वस्ती परिसरात पाईपलाईन व पाणी टाकी कामासाठी लाखो रुपयांचा खर्च दाखवण्यात आला असताना प्रत्यक्षात कामांची स्थिती समाधानकारक नसल्याचे सांगण्यात आले आहे. एकाच कामासाठी वेगवेगळ्या कालावधीत निधी दाखवून बिलांची पुनरावृत्ती केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, १४ व्या वित्त आयोगातून सुमारे ४,६३,४३२ रुपये, १५ व्या वित्त आयोगातून १,८८,८८८ रुपये तसेच इतर कामांसाठी मिळून एकूण सुमारे ७ लाख २७ हजार रुपयांचा निधी खर्च दाखवण्यात आला आहे. तसेच शेळके-कवळे वस्ती परिसरातील पाईपलाईन कामासाठी विविध कालावधीत सुमारे ४ लाखांहून अधिक खर्च दाखवून एकाच कामासाठी अनेक वेळा बिले काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या संदर्भात माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागवूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सरपंच व ग्रामसेवकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, सात दिवसांत चौकशी करून कारवाई न झाल्यास ७ मे रोजी गटविकास अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा तक्रारदार ऍड. मते यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

COMMENTS